Amey Wagh will be involved in marriage | ​अमेय वाघ 'हि'च्यासोबत अडकणार लग्नबंधनात

दिल दोस्ती दुनियादारी या कार्यक्रमामुळे अमेय वाघ हे नाव प्रचंड प्रसिद्ध झाले. तसेच युट्युब वाहिनीवरचा कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण या कार्यक्रमाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. मालिकांमध्ये यश मिळाल्यानंतर अमेय चित्रपटांकडे वळला. अमेयने शटर, अय्या, घंटा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा मुरांबा हा चित्रपट तर सध्या चांगलाच गाजत आहे. अमेयचे फॅन फॉलॉविंग खूपच आहे आणि त्यातही त्याच्या फॅन्समध्ये तरुणींची संख्या अधिक आहे. 
अमेयच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. अमेय लवकरच लग्न करणार आहे. पुढील 11 दिवसांत अमेयचे लग्न होणार आहे. अमेयने ही बातमी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने फेसबुकला त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करून त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती मला 13 वर्षांपासून सहन करत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही आणि तरीही ती आयुष्यभर माझ्यासोबत खूश राहाण्याची आशा करत आहे. किती ब्रेव्ह मुलगी आहे ना ही... तिला आशीर्वाद द्या आणि माझे अभिनंदन करा. साजिरी देशपांडेसोबत मी लग्न करत आहे. त्याचसोबत त्याने वाघाची झाली शेळी असा हॅशटॅग देखील या पोस्टसोबत दिला आहे. त्याच्या या पोस्टला हजाराहून अधिक लाइक आल्या असून हजारोहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. साजिरीचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. कोलगेट या कंपनीत ती कामाला आहे.
अमेयने काही महिन्यांपूर्वी मिथिला पारकरसोबत त्याचे अफेअर असल्याचे सोशल मीडियावर कबूल केले होते. पण ही पोस्ट त्याने केवळ मुरांबा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टाकली असल्याचे काही दिवसांनी स्पष्ट झाले होते. 
Web Title: Amey Wagh will be involved in marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.