Alok Nath becomes a different person when drunk said Renuka Shahane | #MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे
#MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे


टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यानंतर  हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने एका मुलाखतीत सांगितले आहे. यानंतर आता संध्या मृदुलने आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे, चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केलं असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत. 

रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोकनाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. आलोक नाथ यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपानंतर रेणुकाने एका वेबसाइट्शी बोलताना सांगितले की, माझे भाग्य चांगले होते की माझे कधीच त्यांच्यासोबत आउटडोअर शूट नव्हते. माझा त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. पण त्यांची दोन रूपं आहेत असे मी आधीच ऐकले होते. दारू प्यायल्यानंतर त्यांना भान नसते असे मी ऐकून होते. दीपिका देशपांडे या अभिनेत्रीने मला त्यांच्या या दोन रूपांविषयी नव्वदच्या दशकातच सांगितले होते. तसेच ते तरुण मुलींशी पार्टीत दारू पिऊन वाईट वागतात असे मला काहींनी सांगितले होते. पण आता आलोक नाथ यांच्यावर सगळ्यांनी केलेल्या आरोपानंतर मला चांगलाच धक्का बसला आहे. 

English summary :
Metoo Hashtag: Actor Aloknath, who is also known as Sansakari Babu in the world of television and Bollywood, has accused by 'Tara' fame and writer Vineeta Nanda for raping her. Actress Renuka Shahane also show her reaction.


Web Title: Alok Nath becomes a different person when drunk said Renuka Shahane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.