All is Well Command Bandekar's car has accidents, bio-gas | All is Well आदेश बांदेकरांच्या कारला अपघात,भावोजी आहेत सुखरूप

होम मिनिस्टर फेम महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेता आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात झाला आहे.मात्र या अपघातात आदेश बांदेकर हे सुखरूप आहेत अशी माहिती त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी दिली आहे.आदेश बांदेकर कारने कोल्हापुरला जात असताना हा अपघात झाला.यावेळी गाडीचा  टायर फुटल्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात झाल्याचे कळतंय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार बांदेकर भावोजी सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने 1 कोटींचा धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपुर्द  करण्यासाठी जात होते.यावेळी ड्रायव्हरच्या बाजुच्या सिटवरच आदेश बांदेकर बसले होते.त्यांनी सिटबेल्ट लावले असल्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.सुदैवाने आदेश बांदेकर या अपघातातून बचावले असून ते सुखरुप आहेत.चाहत्यांनी काळजी करण्याचे कोणतेही कारण नसून सगळे काही ऑल इज वेल सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले. 

आदेश बांदेकर गेल्या 18 ते 19 वर्षापासून झी वाहिनीवरील प्रसिद्ध शो होम मिनिस्टरचे सुत्रसंचालन करत आहेत. तसेच आदेश बांदेकर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.Web Title: All is Well Command Bandekar's car has accidents, bio-gas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.