अजय-अतुल परफॉर्मे करणार बॉलिवूडच्या 'या' म्युझिक फेस्टिव्हलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:07 PM2018-09-26T15:07:02+5:302018-09-26T15:49:06+5:30

साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल

Ajay-Atul performs at the 'Music' Festival of Bollywood | अजय-अतुल परफॉर्मे करणार बॉलिवूडच्या 'या' म्युझिक फेस्टिव्हलमध्ये

अजय-अतुल परफॉर्मे करणार बॉलिवूडच्या 'या' म्युझिक फेस्टिव्हलमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देअजय-अतुल गोगावले मराठी कलासृष्टी आणि बॉलीवूडमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत

हंगामा बॉलिवूड म्युझिक फेस्टिव्हल आपल्या चौथ्या सीझनला घेऊन लवकरच आपल्या भेटीला येते  आहे.  महाराष्ट्रातील आजच्या घडीचे संगीतकार  अजय- अतुल पहिल्या दिवशी परफॉर्मे करणार आहेत. हा म्युझिक फेस्टिवल 20 आणि 21 ऑक्टोबर दरम्यान बीकेसी, जिओ गार्डन्स येथे रंगणार आहे. 

साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल. दोन दिवस चालणारा हा फेस्टिवल बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. इतकेच नव्हे, तर हा फेस्टिवल संगीत, मनोरंजन, खाद्यपदार्थ आणि अनेक अंगांनी अद्वितीय होणार आहे. 

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अजय-अतुल गोगावले मराठी कलासृष्टी आणि बॉलीवूडमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. अजय गोगावले हे मराठी आणि बॉलीवूड चित्रपट क्षेत्रातले अतिशय यशस्वी संगीत दिग्दर्शक आहेत. अजय-अतुल यांना “जोगवा”साठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय सिने-पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

याआधीच्या कार्यक्रमात अरिजित सिंग, अमित त्रिवेदी, रेखा भारद्वाज, विशाल शेखर, विशाल भारद्वाज, फरहान अख्तर, पापोन, बेनी दयाल, नीति मोहन, शाल्मली खोलगडे, सचिन जिगर, हरिहरन, रफ्तार, बादशहा, हार्डी संधू, गुरू रंधावा, हर्षदीप कौर, रिचा शर्मा, नूरन भगिनी यांनी आपली कला याठिकाणी सादर केली आहे. 50 हजारपेक्षा जास्त लोकांसमोर 200 वादक-कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे.  
 

Web Title: Ajay-Atul performs at the 'Music' Festival of Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.