अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:29 PM2018-10-08T16:29:27+5:302018-10-08T16:30:57+5:30

'अगडबम'चा दमदार सीक्वल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Agadbam Nazuka's thrilling trailer launched | अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच

अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच

googlenewsNext
ठळक मुद्दे'माझा अगडबम' २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला तृप्ती भोईर नाजुकाच्या भूमिकेत


अगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम'चा दमदार सीक्वल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. 


साधी सरळ आणि सोज्वळ अशा सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्यामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. 

'माझा अगडबम' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये नाजुकाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरचा अंदाज प्रेक्षकांचा उर दडपून टाकतो. शिवाय, रायबाच्या भूमिकेत असलेल्या सुबोध भावेसोबतचा तिचा रोमान्सदेखील प्रेक्षकांचे भरपेट मनोरंजन करीत आहे. तृप्तीने या सिनेमात अभिनयाबरोबरच लेखक आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. शिवाय, निर्मात्यांच्या फळीत  टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईरचा समावेश आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. प्रेक्षक नाजुकाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.         

Web Title: Agadbam Nazuka's thrilling trailer launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.