After Khanderaya jhali Majhi Daina Song Surmai New Song is Out | 'खंडेराया झाली माझी दैना' नंतर आता 'सुरमई'चा तडका
'खंडेराया झाली माझी दैना' नंतर आता 'सुरमई'चा तडका

ठळक मुद्देसुरमई गाणे झाले दाखल 'सुरमई' हे रोमँटिक कोळीगीत

कॉलेज फेस्टिव्हल असो वा लग्नाची वरात... सध्या फक्त एकाच गाण्याची चलती आहे आणि ते गाणे म्हणजेच 'खंडेराया झाली माझी दैना... दैना रे... तिच्याविना जीव माझा राहीना...' गुलाबी थंडीत उमलणाऱ्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या या गाण्याने अनेक जोड्या जुळवल्या असून मराठी सिंगल अल्बम्सचे सगळे ठोकताळे मोडीत काढलेत. ट्रेडिशनल गाण्याला दिलेल्या रोमँटिक टचमुळे 'खंडेराया झाली माझी दैना' या गाण्याने महिन्याभरातच तब्ब्ल १९ मिलियन व्ह्यूज तर लाखोंनी लाईक्स मिळवलेत. स्पेशली युथमध्ये गाजलेल्या या गाण्यानंतर पुन्हा एकदा एव्हरेस्ट मराठी एन्टरटेनमेन्ट आणि चेतन गरुड यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या दमाचे धमाल रोमँटिक कोळी गीत रसिकांच्या भेटीला आले आहे. अमित बाईंग दिगदर्शित आणि
प्रवीण शिंदे, पूजा कासकर यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीत रंगलेले 'सुरमई' हे कोळी गीत रसिक-प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला लावणार आहे.    
 
पिंपळगाव हरेश्वर या छोट्याशा गावातील चेतन रवींद्र गरुड या तरुणाने २०१८ मध्ये मराठी सिंगल अल्बममध्ये 'खंडेराया झाली माझी दैना' हे सर्वात लोकप्रिय गाणे मराठी प्रेक्षकांना दिले जे सर्वत्र जोरदार वाजले आणि गाजले देखील. आता प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून त्यांनी आपले दुसरं गाणे २०१९ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट यांचे दुसरे गाणे सुरमई प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


कोळीगीतांची आजही क्रेझ काही कमी झालेली नाही म्हणूनच ते 'सुरमई' हे रोमँटिक कोळीगीत आपल्यासाठी घेऊन आले आहेत. या गाण्याचे बोल प्रवीण बांदकर यांचे असून त्याला संगीत सुद्धा त्यांचेच आहे शिवाय या तडकत्या-भडकत्या कोळी गीताला आदर्श शिंदे यांच्या आवाजाने चारचाँद लावलेत हे विशेष. 'सुरमई'ला अमित बाईंग यांचे नृत्य-दिगदर्शन लाभले असून लॉरेन्स यांच्या छायांकनाने अल्बममधील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम आपल्याला प्रेमात पाडायला भाग पाडते तर या गाण्याचे संकलन अभिषेक ओझा यांनी केले आहे. 'खंडेराया' नंतर आता 'सुरमई'ला ही प्रेक्षक पसंती लाभेल यात काही शंका नाही.


Web Title: After Khanderaya jhali Majhi Daina Song Surmai New Song is Out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.