After 23 years, 'we are you, who will see the onscreen sister again on the silver screen! | 23 वर्षांनी 'हम आपके है कौन'च्या ऑनस्क्रीन बहिणीही पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर!

‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा परत येत आहेत.आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री एकत्र येत आहेत.आपल्या हास्याने पुन्हा एकदा त्या रसिकांना घायाळ करणार आहेत.तब्बल 23 वर्षांनंतर दोघी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.यावेळी बहिणी - बहिणी साकारणार नसल्या तरी एका सिनेमात त्यांचं रसिकांना दर्शन घडणार आहे.या दोन मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे.सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम आपके है कौन'या सिनेमातून सख्ख्या बहिणी साकारणा-या माधुरी आणि रेणुका एका मराठी सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर तब्बल 23 वर्षांनी एकत्र येत आहेत.विशेष म्हणजे हा सिनेमा धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिलावहिला मराठी सिनेमा असणार आहे.खुद्द ट्विटरवर रेणुकाने याबाबतची पोस्ट केली आहे. तेजस विजय देवस्कर या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. एका लघुपटाच्या निमित्ताने तेजसने रेणुका यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्या लघुपटामध्ये रेणुका यांनी काम केलं नव्हतं. मात्र तेजसशी त्या संपर्कात होत्या.एके दिवशी तेजस हा रेणुका शहाणे यांना भेटण्यासाठी आला.त्यावेळी एका मराठी सिनेमाचा उल्लेख केला.त्याने सांगितले की माधुरी दीक्षित या सिनेमात काम करत आहे.माधुरीचे नाव ऐकताच त्या क्षणी मी सुद्धा या सिनेमात काम करण्यास होकार दिल्याचे रेणुका शहाणे यांनी सांगितले.पुन्हा एकदा माधुरीसह काम करण्यासाठी एक्साईटेड असल्याचे सांगत असताना रेणुका शहाणे यांनी 'हम आपके है कौन' सिनेमाच्या वेळच्या आठवणींनाही उजाळा दिला.दोघीही मराठी कुटुंबातून असल्याने त्यावेळी विशेष नातं निर्माण झाली होती.तसंच माधुरी दीक्षित एवढी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती तरीही तिच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजावपणा नव्हता.तिचे पाय जमिनीवरच होते असंही रेणुका शहाणेनी आवर्जून सांगितले.'हम आपके है कौन' या सिनेमानंतर पुन्हा एकदा कधी काम करणार याची प्रतीक्षा होती आणि अखेर तो क्षण सिनेमाच्या निमित्ताने जुळून आला अशी प्रतिक्रियाही रेणुका शहाणे यांनी दिली आहे. या आगामी मराठी सिनेमासाठी कास्टिंग पूर्ण झालं असून मुंबईत या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.यानंतर पुणे आणि परदेशातही या सिनेमाचं शूटिंग होण्याची शक्यता आहे.रेणुकाने स्वतःच्या आणि माधुरीच्या भूमिकेबद्दल फार काही सांगितलं नाही.ट्विटरवर मात्र  माधुरी आणि स्वतःच्या स्मित हास्याची झलक असलेला फोटो पोस्ट केला आहे.यामुळे पुन्हा एकदा निशा आणि पूजा म्हणजेच माधुरी आणि रेणुका यांचे हास्य रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
(Also Read:या कारणामुळे माधुरीची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा लांबणीवर?)


Web Title: After 23 years, 'we are you, who will see the onscreen sister again on the silver screen!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.