Adinath-Urmila's cobweb | आदिनाथ-उर्मिलाचा गुढिपाडवा


           नवीन वर्षाची सुरुवात आयुष्यात खुप सारा आनंद एन चांगल्या गोष्टी घेऊन यावी यासाठी आपला मराठमोळा नवीन वर्षाचा सण गुढिपाडवा सर्वजणच मोठ्या उत्साहात साजरा करतात. असाच गुढिपाडवा मराठी इंडस्ट्रीतील गॉर्जिअस कपल आदिनाथ कोठारे अन उर्मिला कोठारे यांनी साजरा केला. आदिनाथ-उर्मिलाने पारंपारिक वेषात सजुन नववर्षाची गुढि उभारली. उर्मिलाने हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती. कानात झुमके, नाकात नथ अशा अस्सल ठसकेबाज मराठमोळ््या अंदाजात उर्मिला सजली असुन आदिनाथने यल्लो कलरचा कुरता घातला होता. दोघांचीही जोडी या पारंपारिक वेषात एकदमच झक्काय दिसत होती. आपल्या मराठीतील या पॉवर कपलला नवीन वर्षाच्या अन गुढि पाडव्याच्या खुप साºया शुभेच्छा
Web Title: Adinath-Urmila's cobweb
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.