The actress's son, Jhalak, will be seen in Marathi cinema soon | या अभिनेत्रीचा मुलगा झळकणार मराठी सिनेमात,लवकरच रसिकांच्या भेटीला

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही.अभिनय हा त्यांच्या रक्तातच असतो. त्यामुळे स्टार कलाकारांची मुलं आपल्या आईवडिलांप्रमाणेच रसिकांचं मनोरंजन करण्याच्या इराद्याने चित्रपटसृष्टीत दाखल होतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक उदाहरण आहेत ज्यांच्या मुलांनी रूपेरी पडद्यावर एंट्री केली आहे तर काही आगामी काळात रूपेरी पडद्यावर झळकताना दिसतील. बड्या सेलिब्रिटींच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाच ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळतो. महेश मांजरेकर यांचा लेक सत्या, सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया, शुभांगी गोखले यांची कन्या सखी, रविंद्र महाजनी यांचा लेक गश्मीर,महेश कोठारे यांचा लेक आदिनाथ, लक्ष्मीकांते बेर्डे यांचा लेक अभिनययासह विविध कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.आता याच यादीत आणखीन एकाची एंट्री होणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील आजच्या पिढीच्या कलाकारांमधलं आणखी एक नाव म्हणजे विराजस कुलकर्णी. अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे.आता हा विराजस म्हणजे नक्की कोण असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक आहे.विराजस लवकरच 'होस्टेल डेज' सिनेमात झळकणार आहे. विराजसने यापूर्वी नाटकातही काम केले आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर या चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यात विराजस कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Also Read:जनरेशन नेक्स्ट पूर्ण करणार रसिकांचे हे स्वप्न?
 
मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयाप्रमाणे दिग्दर्शन क्षेत्रातही आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. प्रेम म्हणजे प्रेम असते, रमा माधव या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आता या दोन चित्रपटांच्या यशानंतर त्या आणखी एक चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.ती आणि ती असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. या चित्रपटात पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुष्कर आणि प्रार्थना यांची जोडी पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
Web Title: The actress's son, Jhalak, will be seen in Marathi cinema soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.