The actress was married to actress Silk Tipnis | ​अभिनेत्री रेशम टिपणीसचे या अभिनत्यासोबत झाले होते लग्न

रेशम टिपणीसने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने मराठी चित्रपटासृष्टीला एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. केवळ मराठीमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बाजीगर, जय हो, मेरे यार की शादी है यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. त्याचसोबत तिने कॅम्पस, साहेब बिवी और बॉस, सतरंगी ससुराल यांसारख्या मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रेशम टिपणीसने वयाच्या २०व्या वर्षी एका अभिनेत्यासोबत लग्न केले होते. त्या दोघांनी लग्नाच्या काहीच वर्षांत घटस्फोट घेतला.
रेशम टिपणीस आणि अभिनेता संजीव सेठ यांचे लग्न १९९३ला झाले होते. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. त्या दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. लग्न झाले त्यावेळी रेशम २० वर्षांची तर संजीव ३२ वर्षांचा होता. त्या दोघांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांची दोन्ही मुले संजीव सोबत राहातात. संजीवने रेशम सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री लता सब्रवालसोबत लग्न केले. लता आणि संजीव हे अनेक वर्षांपासून रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहेत. ते दोघे या मालिकेत अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका साकारत आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून ती आता चार वर्षांची आहे.

resham tipnis sanjeev seth

रेशम टिपणीसने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, घटस्फोट घेण्याचा निर्णय हा चुकीचा होता असे मला वाटते. मी २०व्या वर्षी लग्न केले होते आणि त्यानंतर काहीच महिन्यांत मला बाळ झाले. मी त्यावेळी मॅच्युर्ड नव्हते. पण माझ्या तुलनेत संजीव हा लग्नासाठी आणि सगळ्या जबाबबदाऱ्यांसाठी तयार होता. आजही मी आणि संजीव एकमेकांशी खूप चांगले बोलतो. संजीवने लतासोबत लग्न केले असून लतासोबत मी पूर्वी एकत्र काम केले आहे. ती खूप चांगली आहे. लता आणि मी आम्ही दोघी खूप चांगल्या फ्रेंड्स नसलो तरी आमच्यात काहीही प्रोब्लेमदेखील नाहीये. तिचे माझ्या मुलांसोबत नाते खूपच चांगले आहे. 

Also Read : ​या मराठमोळ्या अभिनेत्रीला गवसली नवीन मैत्रीण,शूटिंगच्या सेटवर अशी करतात मौजमस्ती
Web Title: The actress was married to actress Silk Tipnis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.