Actress Sonali Kulkarni travel by Mumbai Metro, share her happiness on twitter | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘सोकुल’ मेट्रो प्रवास, फोटो शेअर करत व्यक्त केला सुखद प्रवासाचा अनुभव
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘सोकुल’ मेट्रो प्रवास, फोटो शेअर करत व्यक्त केला सुखद प्रवासाचा अनुभव

धावणारे, पळणारे शहर म्हणजे मुंबई. मुंबईत प्रत्येकजण कायम धावत पळत असतो. त्यामुळे या धावणाऱ्या पळणाऱ्या शहरात वाहतूक कोंडीची ही समस्या पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य मुंबईकर मेताकुटीला येतो. केवळ सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींनासुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा या वाहतूक कोंडीत तासनतास खोळंबतात. मात्र पर्याय नसल्याने कोंडी सुटेपर्यंत त्यांना ताटकळत राहावं लागतं. कारण सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहता ते बाहेर आल्यास कोंडीत भर पडण्याचीच भीती जास्त असते. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याला अपवाद ठरली आहे. 


मुंबईतील अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीत सोनाली अडकली. वर्सोवा इथं शुटिंग स्थळी पोहचण्यासाठी या वाहतूक कोंडीमुळे सोनालीला उशीर होत होता. त्यामुळे सोनालीने ‘सोकुल’ पर्याय निवडला. तिने आपली गाडी तिथेच सोडली आणि अंधेरी मेट्रो स्थानकातून मेट्रोने वर्सोवा इथं जाण्याचा निर्णय घेतला. सोनालीचा मुंबई मेट्रोने प्रवासाचा हा पहिलाच अनुभव होता. तिच्यासाठी हा अनुभव फारच सुखद होता. मेट्रोने वेळेत पोहोचल्याचा अनुभव सोनालीने ट्विटरवर फोटो पोस्ट करत शेअर केला आहे. नियमांचं पालन, फास्ट तसंच कुल प्रवास आणि स्वच्छता यामुळे हा मेट्रो प्रवास सुखद असल्याची प्रतिक्रिया सोनालीने दिली आहे. 


Web Title: Actress Sonali Kulkarni travel by Mumbai Metro, share her happiness on twitter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.