सिनेमानंतर 'या' माध्यामात झळकणार स्मिता तांबे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:37 PM2019-05-20T14:37:18+5:302019-05-20T14:42:11+5:30

स्मिता तांबे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Actress Smita Tambe will be seen in the web series | सिनेमानंतर 'या' माध्यामात झळकणार स्मिता तांबे

सिनेमानंतर 'या' माध्यामात झळकणार स्मिता तांबे

googlenewsNext
ठळक मुद्दे'सावट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे.यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे.

स्मिता तांबे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची छाम उमटवली आहे. 'सावट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. लवकरच ती कंगनाच्या 'पंगा' सिनेमात दिसणार आहे तसेच ती स्केअर्ड गेम्स २ मध्ये सुद्धा दिसणार आहे. 'हवा बदले हसू 'च्या माध्यमातून स्मिता डिजिटल मीडियामध्ये पदार्पण करतेय. 

यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही  पर्यावरण शास्त्रात पी.एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. या भूमिकेबाबत स्मिता खूप उत्साह असून ती सांगते की, ''आरती ही हासूने (एक व्यक्तिरेखा) हाती घेतलेल्या पर्यावरणपूरक मोहीमेत त्याची महत्त्वाची सहकारी बनते. ती हासूकडून रोज प्रवाशांबाबतच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी ऐकत असते आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या या वायू प्रदूषण रोखण्याच्या लढ्याचा एक भाग बनते. आरती आणि हासूचे नातं पर्यावरणाशी एका विशिष्ट पद्धतीने जुळलेले आहे.''  

'हवा बदले हासू' ही विज्ञान-पर्यावरणपूरक थ्रिलर सिरिज आहे. ज्याची सुरुवात एक सामान्य माणसाच्या जीवनशैलीशीपासून होऊन नंतर पुढे ती वाढत जाऊन त्याचे रुपांतर वैज्ञानिक कथेत होते.सप्तराज सिवा यांनी दिग्दर्शन केले आहे तर प्रतिक मुजुमदार यांनी या वेबसिरीजची निर्मिती तसेच सहाय्यक लेखकाची जबाबदारी सुद्धा सांभाळली आहे. लवकरच ही वेबसिरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Actress Smita Tambe will be seen in the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.