The actress is right in the sequel of 'Maharao Saadi' for Alka Kubal Sangatayet | ​अलका कुबल सांगतायेत माहरेची साडी या चित्रपटाच्या सिक्वलसाठी हीच अभिनेत्री योग्य

आजही मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सिक्वलची लवकरच निर्मिती केली जाणार आहे. ९०च्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. ज्या काळात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची प्रतीक्षा असायची, त्याकाळात या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला एक वेगळाच लौकिक मिळवून दिला होता. विशेषत: महिला रसिकांना या चित्रपटाने आपलेसे केले होते. आता पुन्हा एकदा असाच काहीसा इमोशनल ड्रामा पडद्यावर रंगविण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. १९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती केली जाणार आहे. तब्बल २६ वर्षानंतर दिग्दर्शक विजय कोंडके हे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या निर्मितीवर काम करीत आहेत. चित्रपटाची पटकथा तयार असून, कलाकार व तंत्रज्ञ यांची निवड करताच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीची सध्या शोधाशोध सुरू आहे. 
माहेरची साडी या चित्रपटामध्ये अलका कुबल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आजही प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करतात. या चित्रपटाच्या सिक्वलसाठी कोणती अभिनेत्री योग्य असेल हे अलका यांनीच नुकतेच सांगितले आहे. या चित्रपटासाठी अलका कुबल यांच्या मते माहेरची साडी या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर खूपच चांगल्याप्रकारे साकारू शकेल. तिचे बाजी सिनेमातील काम अलका कुबल यांना फार आवडले होते. त्यामुळे ती ही भूमिका इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने वठवू शकेन याची त्यांना खात्री आहे.
अमृताने आजवर तिच्या कारकिर्दीत ग्लॅमरस भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे अमृताने खरेच हा चित्रपट स्वीकारल्यास अमृताचा एक वेगळा अंदाच प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात काही शंका नाही.  
‘माहेरची साडी’ या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी अतिशय दमदार अशी भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी ‘सोशिक सून’ साकारली होती. या चित्रपटाने अलका कुबल यांना रातोरात स्टारचा दर्जा मिळवून दिला होता. शिवाय त्यांना एक वेगळीच ओळखही मिळवून दिली होती. चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणे त्यावेळी प्रचंड हिट झाले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. अलका कुबल यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

Also Read : अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!
Web Title: The actress is right in the sequel of 'Maharao Saadi' for Alka Kubal Sangatayet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.