Actress Priya Marathe hatchi new inning! | अभिनेत्री प्रिया मराठे हिची नवी इनिंग!

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत.बॉलिवूडची धकधक गर्ल ऑनलाईन नृत्याचे धडे देत आहे तर अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचा स्वतःचा इंटिरिअरचा बिझनेस आहे.शाहरुख खान,प्रिती झिंटा आयपीएल क्रिकेट संघाचे मालक आहेत.त्यामुळे अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे.अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले.तेजस्विनी आणि अभिज्ञाप्रमाणे आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे.या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया मराठे. प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. नुकतंच या कॅफेचे उद्घाटन झाले आहे.यावेळी प्रियाचे निकटवर्तीय मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.या कॅफेच्या उदघाटनाचा फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.'द बॉम्बे फ्राईज' असं या कॅफेचे नाव असून आपल्या नव्या इनिंगबाबत ती बरीच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रियाच्या या नव्या उपक्रमाला तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली.गेल्या वर्षी तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने गोदावरी ही व्यक्तीरेखा साकारली होती.
'पवित्र रिश्ता' या मालिकेती  वर्षा या भूमिकेमुळे  प्रिया मराठे घराघरात पोहचली.तसेच ही मालिका आजही इंडोनेशियामध्ये सुरु आहे.त्यामुळे भारतात प्रमाणेच परदेशातही प्रिमा मराठेचे चाहते पाहायला मिळतात.प्रिया मराठेच्या करिअरच्या सुरूवातीला सोशल नेटवर्किंग वगैरे असे काही नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष कुणी भेटले तर त्या रसिकांची मतं तिच्यापर्यंत पोहचायची. आता मात्र सोशल मीडियामुळे क्षणाक्षणाला रसिकांच्या प्रतिक्रिया येत असतात.तसेच  चाहत्यांशी थेट कनेक्ट होण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती अपडेट करताना दिसते.

Web Title: Actress Priya Marathe hatchi new inning!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.