Actress acted as a child? Today is the leading heroine | लहानपणी अशी दिसायची ही अभिनेत्री? आज आहे आघाडीची नायिका

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करते. तिचे हसणे,बोलणे सारे काही अगदी मोहक असते. रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते.नेहमी तिच्या गॉर्जिअस लूक असलेले फोटो सोनाली सोशल मीडियावर शेअर करत असते.मात्र यावेळी तिने एक खास फोटो शेअर करत सा-यांना आश्चर्यचकीत केले आहे. होय, एक गोंडस लहान मुलीचा फोटो सोनालीने शेअर केला आहे. या फोटोत दिसणा-या मुलीने शाळेतला युनिफॉर्म घातला आहे. फोटोत दिसणारी मुलगी कोण आहे ? असा विचार तुम्ही करत असाल तर ती आहे.तुमची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. होय, फोटोत तिचा क्युटनेस पाहून सारेच चाहते तिच्या या फोटोला प्रतिक्रीया देतायेत.विशेष म्हणजे सोनाली लहानपणापासून नटखट असल्यामुळे आजही ती वेळोवेळी अशीच नटखट अंदाजात पाहायला मिळते. सोनालीचा क्युट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला होत आहे. मुळात सोनाली अभिनयासोबतच उत्तम फोटोग्राफर असल्याचेही तिने क्लिक केलेल्या फोटोवरून समजतं.नुकतेच तिने हम्पी येथे अनेक रम्य स्थळांना भेट देत तेथील काही स्थळांना कॅमे-यात कॅप्चर केले आहे. यातली काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केली आहेत.लहानपणीचा सोनालीचा तोच क्युटनेस आजही तिच्या वेगवेगळ्या फोटोंमध्ये झळकत असतो. सोनालीला मराठी रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे.त्यांचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवू शकले.त्याच जोरावर तिला बाॅलिवूडची संधीही मिळाली.'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' या सिनेमात बाॅलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह ती रूपेरी पडद्यावरही झळकली. या दोन्ही  सिनेमात  भूमिका तुलनेने छोट्या असल्या तरी  हा अनुभवसुध्दा बरेच काही शिकवणारा असल्याचे तिने सिएनएक्स मस्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. Web Title: Actress acted as a child? Today is the leading heroine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.