Actor who is waiting for 'Rikshwala' is waiting for this reason because of the role of 28 actors. | या कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका

cnxoldfiles/a> या सिनेमाची खासियत म्हणजे मानसी यांत एक दोन नाही तर तब्बल २८ व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. या व्यक्तीरेखासुद्धा साध्यासुध्या नसून गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड कलाकारांच्या आहेत. यांत हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री मधुबाला, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मानसी केवळ अभिनेत्रींच्या व्यक्तीरेखा साकारणार नसून बॉलिवूडच्या हिट नायकांच्या व्यक्तीरेखाही ती साकारणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन, दबंग सलमान खान, असरानी अशा कलाकारांच्या गाजलेल्या व्यक्तीरेखा मानसी रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. काही तरी हटके करत बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना ट्रिब्युट देण्याचा नितीन चंद्रकांत देसाई यांचा या सिनेमातून प्रयत्न आहे. या भूमिका साकारण्यासाठी मानसी परफेक्ट होती असे ते म्हणतात. तसंच ती एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. त्यामुळे या सगळ्या २८ व्यक्तीरेखांना ती न्याय देऊ शकेल असा त्यांना विश्वास आहे.दुसरीकडे नितीन चंद्रकांत देसाई हे एक उत्तम दिग्दर्शक आहेत. त्यांना एखादी गोष्ट सुचवली की तीही ते ऐकून घेतात. तसंच त्यांनी २८ व्यक्तीरेखा साकारण्याची संधी देत मोठा विश्वास दाखवला असं मानसी म्हणते. त्या व्यक्तीरेखांना पुरेपूर न्याय देण्याचं आव्हान होतं असंही मानसीने म्हटलं आहे.कंगणा,असरानी,झीनत अमान आणि डोक्यावर मडकी घेऊन आधा हैं चंद्रमा गाण्यावर थिरकणा-या संध्या यांच्या व्यक्तीरेखा साकारणं बरंच कठीण आणि तितकंच आव्हानात्मक होतं असं मानसीने म्हटले आहे.मध्यंतरी मानसी मराठी बिग बॉसमध्ये झळकणार अशा चर्चा होत्या.मात्र ती बिग बॉसमध्ये दिसली नाही. असं असलं तरी या सिनेमाच्या निमित्ताने मानसीला मोठी लॉटरी लागली असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
Web Title: Actor who is waiting for 'Rikshwala' is waiting for this reason because of the role of 28 actors.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.