अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:10 PM2019-02-15T17:10:10+5:302019-02-15T17:12:45+5:30

कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे नितीन रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.

Actor Varun Dhawan wishes to share the poster of this Local Via Dadar Movie, in love with Marathi cinema! | अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

googlenewsNext

आता पर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमाच्या प्रेमात पडल्याचं पाहिलंय या यादीत अजून एका अभिनेत्याची भर पडलीय तो अभिनेता वरूण धवनची. दिग्दर्शक नितीन रोकडे यांच्या आगामी ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला. नुकतेच त्याने ‘लोकल-व्हाया-दादर’ सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत दिग्दर्शक नितीन रोकडे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.



 

 

खुद्द वरूण धवन सिनेमाच्या प्रमोशन करताना दिसतोय. त्यामुळे सिनेमात वरूण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे वरूण धवनची या निमित्ताने मराठीत एंट्री होणार असल्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होते. नुकत्याच सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात कऱण्यात येणार आहे. सिनेमात कोणकोणत्या कलाकाराच्या भूमिका असणार हे ही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. 

करूणावी क्रिएटरची निर्मिती असलेल्या ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटामध्ये एक निरागस प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन रोकडे यांची असून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाचे संकलन करणा-या नितीन रोकडे यांनी यापूर्वा ‘तालीम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे नितीन रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.

चित्रपटाचे संवाद सायली केदार यांचे असून फारूख खान छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. अतिक अलाहाबादी यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून या गीतांना संगीतकार विक्रम मॉन्ट्रोज संगीतबद्ध करणार आहेत. कलादिग्दर्शन नितीश रॉय करणार असून प्रॉडक्शनची जबाबदारी सदाशिव चव्हाण सांभाळणार आहेत.

 
 

Web Title: Actor Varun Dhawan wishes to share the poster of this Local Via Dadar Movie, in love with Marathi cinema!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.