Actor Saif Ali Khan will be seen in the lead role in 'Ease 2' | 'इसीस 2'सिनेमात लादेनच्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता

'इसिस २'सिनेमात क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता जगभरात आज दहशतवादाने थैमान घातले आहे. असंख्य देश आज या दहशतवादाच्या कचाट्यात सापडले आहेत. दररोज माध्यमांमधून घातपाताच्या आणि हिंसाचाराच्या घटना आपण ऐकतोय. विमान अपहरणाची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा क्रूर चेहरा दाखविणारा चित्रपट आपल्यासमोर येतोय. दहशतवादाचे वास्तव दाखवून देत एका विमान अपहरणाची गोष्ट सांगणाऱ्या 'इसिस २ एनिमीज ऑफ ह्युमिनीटी’ ( ISIS II )  या इंग्लिश व हिंदी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.अटलांटिक फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन व संकलन युवराज कुमार यांचे असणार आहे.

दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणावर चित्रपटाच्या पहिल्या भागात भाष्य करण्यात आले होते.चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या विमान अपहरणाची तसेच या अपहरणनाट्यानंतर वेगवेगळ्या देशातल्या सुरक्षा यंत्रणांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलची कथा मांडण्यात आली आहे.या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून दुसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास दिग्दर्शक व कलाकारांनी यावेळी व्यक्त केला.

रशीद नाझ, रिपी कौल, हरीश भिमानी युवराज कुमार, राहुल देव, रवी खन्ना, हुमा अलेक्झांडर, लीवोनेल, मनोज पवार, स्वप्नील मक्षीम, कमल करमचंदानी, रीचड भक्ती, अॅलेक्स अॅडम,  डेव्हिड जुमा, जावेद जय,विनोद जेठमलानी, कौशिक चक्रवर्ती, मनीषा राम केळकर गॅरी या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. हेमंत राम केळकर यांची पटकथा असून हरीश भिमानी यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. हनी शर्मा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक असून कलादिग्दर्शक अरुण राठोड आहेत. आकाश राज चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. रंगभूषा प्रकाश साळवी यांची असणार आहे.


मनिषा केळकरने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे.तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मनिषाला आता एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.कारण आता मराठी, हिंदी चित्रपटानंतर इंग्रजी चित्रपटामध्ये झळकणार आहे.'इसीस' हा चित्रपट आपल्याला हिंदीत पाहायला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना इंग्रजीत पाहायला मिळणार असून या चित्रपटात मनिषा एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मनिषाचा हा पहिला इंग्रजी चित्रपट असला तरी तिने याआधी इनफ इज इनफ या इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा वापर असलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले होते. या शॉर्ट फिल्मचे अनेक फेस्टिव्हमध्ये कौतुक करण्यात आले होते. या शॉर्ट फिल्ममधील भूमिकेसाठी मनिषाला स्पर्श मुंबई फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. 
Web Title: Actor Saif Ali Khan will be seen in the lead role in 'Ease 2'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.