Actor, not singer, want to be the perfect artist! | ​अ‍ॅक्टर, सिंगरच नाही, परिपूर्ण कलाकार व्हायचेय!


-अभिनेत्री मानसी नाईकची सीएनएक्सला विशेष मुलाखत

अभिनेत्री मानसी नाईक हिला कुठल्याही नव्या ओळखीची गरज नाही. कॉलेजमध्ये डान्सची अनेक पारितोषिके मिळवत मानसी मॉडेलिंगमध्ये आली. नंतर छोट्या पडद्यावर आणि पुढे ‘जबरदस्त’ या महेश कोठारेंच्या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत आली. यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही. ‘बघतोय रिक्षावाला..’ हे मानसीचे आयटम साँग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. अलीकडे ती लावणीवरील रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणूनही दिसली. हीच मानसी आता गायिका बनली आहे. होय, स्वरूप भालवणकर दिग्दर्शित ‘इश्काची बेबी डॉल’ हे मानसीने गायलेले पहिले वहिले सिंगल सध्या सगळ्यांच्या ओठांवर आहे. अभिनेत्री ते गायिका या प्रवासांबद्दल मानसीशी सीएनएक्सशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा... 

प्रश्न : गायिक म्हणून तुझा पहिला डेब्यू होतोय, कसं वाटतयं?
मानसी : खूप उत्सूक आहे तेवढीच नव्हर्स. खरे तरं मी स्वत:ला बाथरूम सिंगरही मानत नाही. मी गाणार, अशी कल्पनाही केली नव्हती. मी गायले, याचं सगळं क्रेडिट गायक व संगीत दिग्दर्शक स्वरूपला जातं. त्याने मला थेट रेकॉर्डिंगसाठीच उभे केले. खरे आभार त्याचेच. प्रश्न : तुला गायचे आहे, असे तुला सांगण्यात आले. त्यावेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? 

मानसी : नकळतपणे स्वरूप मला बोलून गेला, की हे गाणे तू गाणार आहे. यावर ‘व्हॉट’ अशीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. पण स्वरूपने माझ्यावर विश्वास दाखवला. त्याच्या कसोटीवर मला खरे उतरायचे होते. अन्य गायकांच्या तुलनेत मी गाणे म्हणजे खरोखरीच आव्हान होते. पण मी हे आव्हान पेलले. मी गायले आणि गायिका बनले. 


प्रश्न : सिंगिंगमधील करिअर मानसीने गंभीरपणे घेतलेयं, असे म्हणायला हरकत नाही? 
मानसी : (खळखळून हसत) मला परिपूर्ण कलाकार व्हायचे आहे, एवढेच. 

प्रश्न : मानसी, तुला डॉक्टर व्हायचे होते, मग मॉडेलिंग, डान्स, अ‍ॅक्टिंग हा प्रवास कसा सुरू झाला. 
मानसी : हो, हे खरे आहे. माझे वडील संशोधक आहेत. त्यामुळे त्यादिशेने प्रवास सुरू झाला होता. पण अ‍ॅक्टिंगचा फॉर्म्युला ट्राय करून पाहावाच म्हणून मी हा मार्ग निवडला आणि प्रवास सुरू झाला. आत्ताही माझी सुरुवात आहे. कारण मी कष्टाला महत्त्व देणारी आहे. मला आणखी बरेच कष्ट कराचेत. 

प्रश्न : मॉडेल, डान्सर, अ‍ॅक्ट्रेस वा सिंगर यापैकी तुला काय म्हणून लोकांनी ओळखावे असे तुला वाटते? 
मानसी : अलीकडे मी एका मोठ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून काम केलेय. तिकडे मी एक गोष्ट शिकले. ते म्हणजे एका ज्युरी मेंबरला पक्षपाती राहून चालत नाही. मग तो कलाकार असो वा नसो. कलाकार या नात्याने मला केवळ नृत्य आवडते किंवा अभिनय आवडतो, असे मी म्हणूनच म्हणणार नाही. परिपूर्ण कलाकार हा परिपूर्ण कलाकारच असतो. मग त्याला लोक परिपूर्ण म्हणूनच ओळखतात. म्हणून मी पक्षपात करू इच्छित नाही. माझ्यामुळे माझे मायबाप प्रेक्षक खूश झाले पाहिजेत.

प्रश्न : मराठी फिल्म मेकर्सकडून तुझे टॅलेंट थोडे दुर्लक्षित झालेय, असे तुला वाटते का? 
मानसी : हो, तस वाटतं. माझ्या डान्समुळे मला अ‍ॅक्टिंगमध्ये बरीच मदत झाली. अ‍ॅक्टिंगमध्ये मी स्वत:ला सिद्धही केलय. पण मला खूप काही करायचयं. त्यामुळे कदाचित एक परफॉर्मन्स ओरिएंटेड प्लॅटफॉर्म वा संधी मला मिळायला हवी. तसं झालं तर निश्चितपणे मी या संधीचे सोने करेल. त्यामुळेच मला अशी संधी देणाºया दिग्दर्शकाची, त्या स्क्रिप्टची,त्या कॅमेºयाची, त्या टेक्निशिअनची आतुरतेने प्रतीक्षा करतेय.

प्रश्न : ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात जज  होण्याचा अनुभव कसा होता? 
मानसी : नितांत सुंदर होता. लावणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. प्रेक्षकांच्या मनावर बिंबवावी असा प्रयत्न होता. या प्रयत्नांत माझे योगदान होते, याचाच मला आनंद आहे. या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले. 

प्रश्न : नवा प्रोजेक्ट काय?
मानसी : भरपूर आहेत. त्याबद्दल आत्ता काही बोलणार नाही. फक्त मी एवढेच म्हणेल की, प्रेक्षकांनी मला आत्तापर्यंत निखळ प्रेम दिले, ते यापुढेही मिळत राहो. 

प्रश्न : येत्या काळात कुठल्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल? 
मानसी : बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी, अनुराग कश्यप, इम्तियाज अली, विकास बहेल, विशाल भारद्वाज, सोहेल खान अशी ही खादी खूप मोठी आहे. मराठीत नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, सुबोध भावे,संजय जाधव यांच्यासोबत काम करणे मला आवडेल. 

प्रश्न : तुझा ड्रिम प्रोजेक्ट काय? 
मानसी : माझा असा कुठलाही ड्रिम प्रोजेक्ट नाही. स्वप्नातली भूमिका मिळाली तर मी तिथेच थांबले. प्रेक्षकांचे मी कायम मनोरंजन करत राहावे आणि त्यामोबदल्यात मला त्यांचे प्रेम मिळत राहावे, एवढेच मला हवे आहे.

 प्रश्न : गायिका बनण्याची संधी यापूर्वीही मिळाली असती तर तू ती कॅश केली असतीच, असं म्हणता येईल?
मानसी : व्हाय नॉट? स्वरूप एक टॅलेन्टेड म्युझिक डायरेक्टर आहे. त्याने विचारताच मी होकार दिला. पण संपूर्ण चित्रपटसृष्टी माझी फॅमिली आहे. या कुटुंबातील प्रत्येकासोबत काम करायला मिळाले तरी माझी ना नसेल. पूर्वी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट काळात कलाकारच आपल्या गाण्यांना प्लेबॅक द्यायचे. आज हॉलिवूड व बॉलिवूडमध्येही अनेक नट-नट्या अभिनयासोबत गात आहेत. यातील एक बनण्याचा आनंद मला आहेच. एक परफॉर्मर, एक डान्सर, एक अभिनेत्री गायिकाही बनू शकतेच, हे मी पुन्हा एकदा सिद्ध केल.


 प्रश्न : मानसी, चित्रपटसृष्टीत नवीन टॅलेंट येत आहे, त्यांच्याबद्दल काय वाटते? कधी त्यांच्याशी स्वत:ची तुलना तू करतेस काय? 
मानसी : खरं सांगायचे तर माझी तुलना कुणाशी होतच नाही आणि मी स्वत:ही माझी तुलना दुसºयाशी करीत नाही. माझी स्पर्शा केवळ माझ्याशी आणि माझ्याशीच आहे. कारण समजा उद्या मी ठरवले की मला काम करायचेच नाही तर कुणीही माझ्याकडून काम करवून घेऊ शकणार नाही. नव्या कलाकारांबद्दल विशेषत: मराठी कलाकारांबद्दल बोलायचे तर मराठी पाऊल पडती पुढे..या तत्त्वाने मी त्यांना पूर्ण पाठींबा देईल. त्यांचे कौतुक करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. 
 
Web Title: Actor, not singer, want to be the perfect artist!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.