"अशी ही आशिकी" चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळेचा रोमाँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:00 AM2019-02-14T08:00:00+5:302019-02-14T08:00:00+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करतेय या चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. लक्ष्मीकांत यांचा मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणाविषयी मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा झाली होती.

Abhinay Berde and hemal ingle romantic style in movie ashi hi aashiqui | "अशी ही आशिकी" चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळेचा रोमाँटिक अंदाज

"अशी ही आशिकी" चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळेचा रोमाँटिक अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देहेमल इंगळे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण करते आहेदिग्दर्शनासोबत सचिन पिळगांवकर यांनी संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करतेय या चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. लक्ष्मीकांत यांचा मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणाविषयी मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा झाली होती. ती सध्या काय करतेय नंतर नवीन काय, असा प्रश्नही विचारण्यात येत होता. निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा अभिनय मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यानिमित्त चित्रपटाची टीमने लोकमत ऑफिसमध्ये भेट दिली.

 सचिन पिळगांवकर दिग्दर्शित अशी ही आशिकी हा मराठी चित्रपट येत्या १ मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर हेमल इंगळे ही अभिनेत्री या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील रूपेरी पडद्यावर पर्दापण करत आहे. या चित्रपटात अभिनय बरोबर हेमल इंगळे ही अभिनेत्री त्याची नायिका असणार आहे. या चित्रपटासाठी एखाद्या नव्या चेहºयाच्या शोधात चित्रपटाची टीम असल्यानेच हेमल इंगळेची निवड करण्यात आली.  चित्रपटाच्या चित्रीकरण वेगवेगळ््या ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील ‘‘समझे क्या ’’ या गाण्याचे चित्रीकरण स्विर्झलँडमध्ये करण्यात आले आहे.  टी सिरीज या चित्रपटाची निर्मिती करत असून येत्या व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक आगळेवेगळे गिफ्ट असणार आहे. 

सचिनजी म्हणाले, "अनेक वर्षांपासून निखळ प्रेमावर आधारित चित्रपट मराठी प्रेक्षकांनी पहिला नाहीये. मी सुद्धा अशा प्रकारचा चित्रपट प्रथमच दिग्दर्शित करत आहे. 'अशी ही आशिकी'च्या निमित्ताने प्रेक्षकांचं आणि माझं स्वप्न एकाच वेळी पूर्ण होणार आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच अभिनय आणि मी वेगवेगळ्या गोष्टींवर एकत्र काम करत होतो. आम्ही हेमल इंगळेची निवड या चित्रपटासाठी केली आणि तिनेही हे काम लीलया केलं." हेमल म्हणाली, "सचिनजींसारख्या अभिनेता दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळते आहे हे माझं भाग्यच आहे. ते खूप खेळीमेळीचे वातावरण सेटवर ठेवायचे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान मला दडपण आले नाही." 

अभिनयने चित्रपटाविषयी अनेक खुमासदार गोष्टी यावेळी शेअर केल्या. तो म्हणाला, "मागच्या वर्षी व्हॅलेन्टाईन्स डेला जेव्हा सचिनजींनी मला या चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं तेव्हा मला दडपण आलं होतं. पण माझ्या आईने मला त्यावेळी प्रोत्साहित केलं. आज एका वर्षानंतर रोमँटिक चित्रपट तयारसुद्धा झाला आहे. याबद्दल कौतुक करायचं झालं तर ते केवळ सचिनजी यांचं करावं लागेल. तरुणाला लाजवेल असा उत्साह, अष्टपैलू व्यक्तिमत्व, काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती हे सारं त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे."

गुलशन कुमार प्रस्तुत अशी ही आशिकी ची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निमार्ते आहेत. दिग्दर्शनासोबत सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील त्यांनीच लिहिले आहेत.

या चित्रपटाच्या सुरुवातीला हेमलच्या ऐवजी 'रकम्मा' गाण्यातून रकम्माला शोधणारा स्वयम, त्यानंतर मेड फॉर इच अदर अशी जोडी असलेल्या स्वयम आणि अमरजाचे रोमँटिक गाण्यातला क्युट रोमान्स आणि आता आशिकीची नशा वाढवणारे हे गाणे आहे. अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेले गाणे म्हणजे अकापेला गाणे. 'समझे क्या' हे गाणे प्रेमवीरांना उत्स्फुर्त करणारे आहे.
 

Web Title: Abhinay Berde and hemal ingle romantic style in movie ashi hi aashiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.