Abhayarani will do Marathi cinema | आसरानी करणार मराठी सिनेमा

हिंदीमध्ये आपल्या वेगळ्या ढंगाच्या अभिनयाने चंदेरी पडदा गाजवणारा व्हेटरन कलाकार कॉमेडियन आसरानी लवकर मराठी चित्रपटात काम करणार आहे. ‘फॅमिली 420’ या सिनेमात तो झळकणार आहे.

देव राज निर्मित व संतोष गायकवाड दिग्दर्शित या  चित्रपटात आसरान महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत अशी माहीत प्राप्त झाली. चित्रपट स्वीकारून आनंदित आसरानी यांनी सांगितले की, प्रेक्षकांना हसविणे माझे काम आहे. आयुष्यभर मी ते करत आलोय आणि पुढेही करणार. आता मराठी चित्रपटातून मला ही संधी मिळतेय म्हणून मी फार आनंदी आहे. माझी विनोदी भूमिका जरी असली तरी ती आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे.

शीर्षकावरूनच हा चित्रपट तुफान विनोदी असणार याचा अंदाज येतो. त्यात आसरानी म्हटल्यावर तर विचारूच नका! त्यासोबतच चित्रपटात सामाजिक संदेशही दिला जाणार, असे निर्मात्यांनी सांगितले.

sunil

यामध्ये आसरानी यांच्याबरोबर सुनिल पाल, उपासना सिंग, विजय पाटकर, विजय कदम, स्वप्नील राजशेखर, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी आदी कलाकार असणार आहेत. सुशिल पंढरी यांनी संगीत दिले आहे.
Web Title: Abhayarani will do Marathi cinema
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.