अभिनेता अभय महाजनने दिलं दिप्तीला असं बर्थ डेचं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:55 PM2019-01-29T14:55:48+5:302019-01-29T15:13:53+5:30

दिप्ती सती आणि अभय महाजन हे एम-टाउनमधले नवे कपल आहेत. लकी-जियाची ही जोडी ब-याचदा ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही एकत्रचअसते

abhay mahajan give birthday surprise to dipti sati | अभिनेता अभय महाजनने दिलं दिप्तीला असं बर्थ डेचं सरप्राईज

अभिनेता अभय महाजनने दिलं दिप्तीला असं बर्थ डेचं सरप्राईज

ठळक मुद्देअभयने दिप्तीचा वाढदिवस खूप रोमँटिक पध्दतीने नुकताच साजरा केलालकीमधून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.

दिप्ती सती आणि अभय महाजन हे एम-टाउनमधले नवे कपल आहेत. लकी-जियाची ही जोडी ब-याचदा ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही एकत्रच असते. 29 जानेवारीला दिप्तीचा वाढदिवस असतो. अभयने दिप्तीचा वाढदिवस खूप रोमँटिक पध्दतीने नुकताच साजरा केला.

अभयने दिप्तीचा वाढदिवस ब्रिंग-इन करण्याचा परफेक्ट प्लॅन तिच्या आईसोबत मिळून आखला होता. दिप्तीच्या आईला सांगून तिला बाहेर घेऊन जायला लावलं आणि तिथे अनपेक्षितपणे उपस्थित राहून तिला खूप छान रोमँटिक सरप्राइज दिलं. एम-टाउनच्या ह्या नव्या कपलमध्ये फुलणारी मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे.

अभय महानला विचारल्यावर तो ह्याविषयी म्हणतो, “ती माझी लकी गर्ल आहे. त्यामूळे तिचा बर्थडे स्पेशल बनवायचा प्लॅन होता. दिप्तीला सरप्राइज दिल्यावर तिचा चेहरा अगदी लहानमुलासारखा फुलतो. मी तिला मुद्दामहूनच हा नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगितलं होतं. तिला माझी उपस्थिती अजिबात अपेक्षित नव्हती.”

बर्थडे गर्ल दिप्ती म्हणते, “ मी खूप लकी आहे, की माझ्यावर एवढंल प्रेम करणारी माणसं मला आयुष्यात मिळाली. रात्री 12 वाजता हातात फुलं घेऊन बर्थ डे विश करायला येण्याचं अभयच सरप्राइज मला खूप आवडलं. त्याला खूप रोमँटिक आइडिया सुचतात.”

लकीमधून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: abhay mahajan give birthday surprise to dipti sati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.