24 years later Madhuri Dixit took the lead on her song 'Ho Chali Me' with her sister! | २४ वर्षांनंतर माधुरी दीक्षितने बहिणीसोबत ‘लो चली मैं’ या गाण्यावर धरला ठेका!

धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रित डेब्यू करीत आहे. या चित्रपटात ती एका विवाहित महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तिच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘लो चली मैं’ या गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळत आहे. दोघींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये माधुरी आणि रेणुका एकत्र आपल्या चित्रपटाच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करीत आहेत. ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रेणुका आणि माधुरी यांनी दोघी बहिणींची भूमिका साकारली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली होती. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळते. या चित्रपटात सलमान खाननेही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये केवळ माधुरी आणि रेणुका या दोघीच बघावयास मिळत आहे. दोघींचा हा व्हिडीओ बघून तुमच्या चेहºयावर नक्कीच हास्य फुलेल. 
 }}}} ">Madhuri & Renuka reunite & recreate ‘Lo Chali Mai’ on the sets of Bucket list! #BucketList#25thMay@Madhuridixit@dharmamovies@karanjohar@AAfilmsIndia@darkhorsecine@DARPictures@bluemustangcs@tejasdeoskarpic.twitter.com/AOmJ6AnFeo

— Komal Nahta (@KomalNahta) May 20, 2018
दरम्यान, माधुरीचा हा चित्रपट येत्या २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या तिच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा ट्रेलर या अगोदरच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये माधुरीचा अंदाज बघण्यासारखा आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. 
Web Title: 24 years later Madhuri Dixit took the lead on her song 'Ho Chali Me' with her sister!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.