1st Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला वर्ष झाले पूर्ण,पेशवे स्टाईलमध्ये दिसला होता स्वप्नील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 10:12 AM2017-12-05T10:12:57+5:302017-12-05T15:42:57+5:30

छोट्या पडद्यावरील आपल्या विविधांगी भूमिकांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले आहे. व्यावसायिक ...

1st Wedding Anniversary: ​​Happy Birthday to Mrinmayee Deshpande, Dreamer appeared in Peshwa style | 1st Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला वर्ष झाले पूर्ण,पेशवे स्टाईलमध्ये दिसला होता स्वप्नील

1st Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला वर्ष झाले पूर्ण,पेशवे स्टाईलमध्ये दिसला होता स्वप्नील

googlenewsNext
ट्या पडद्यावरील आपल्या विविधांगी भूमिकांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले आहे. व्यावसायिक स्वप्नील रावसह मृण्मयीचे 3 डिसेंबरला शुभमंगल पार पडले होते. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहिल. त्याने खास पेशवे स्टाईलमध्ये पगडी आणि कपडे परिधान केले होते. या लग्न सोहळ्याला मृण्मयीचे चित्रपटसृष्टीतील खास मंडळींनी हजेरी लावली. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून मालिकांसोबतच मृण्मयीने कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे.


'मेड फॉर इच अदर' कपल संग्राम आणि पल्लवीने साजरी केली 1st Wedding Anniversary, बघा लग्नाचा अल्बम
पल्लवी आणि संग्राम एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यावेळी संग्रामच्या घरी मुली पाहण्याचे कार्यक्रम सुरु झाले होते. अशातच दोघं एके दिवशी आऊटिंगला गेले. त्यावेळी दोघांनाही क्लिक झालं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. दोघांनी एकमेकांशी लग्न केलं तर असा विचार त्यांच्या मनात आला. हीच बाब लागलीच दोघांनी आपापल्या घरी सांगितली.संग्राम आणि पल्लवी लग्नासाठी तयार असताना घरच्यांचा विरोधाचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तात्काळ याला होकार दिला आणि संग्राम-पल्लवी अवघ्या ८ दिवसांत रेशीमगाठीत अडकले होते.

श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरने साजरी केली 1st Wedding Anniversary
श्रुती मराठे आणि  गौरव घाटणेकर गेल्या वर्षी 4 डिसेंबर 2016 ला  रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. तसेच श्रृती आणि गौरव सोबतचे अनेक झक्कास फोटो देखील कलाकारांनी शेअर केले होते. दोघांची पहिली भेट लग्नाच्या 3 वर्षे अगोदर तुझी-माझी लव्ह स्टोरी या  सिनेमाच्या सेटवर  सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला.

Web Title: 1st Wedding Anniversary: ​​Happy Birthday to Mrinmayee Deshpande, Dreamer appeared in Peshwa style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.