लाइव न्यूज़
 • 12:46 PM

  पणजी : फॉर्मेलिन मासेप्रश्नी गोंधळ सुरूच, सलग तिसऱ्या दिवशीही गोवा विधानसभा तहकूब

 • 12:02 PM

  सिंधुदुर्ग : बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जळते टायर टाकून अज्ञातांकडून प्रकार, आंदोलन स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे झेंडे आढळले.

 • 12:01 PM

  दिल्ली - पी. चिदंबरम यांचा दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टात जामीन अर्ज दाखल.

 • 11:45 AM

  मुंबई : सायन रुग्णालयात मुलाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाबाहेर गाड्याची तोडफोड

 • 11:15 AM

  औरंगाबाद : गस्तीवरील पोलिसांना सातारा परिसरात अनोळखी मृतदेह आढळला

 • 11:13 AM

  नाशिक : मनमाडमधील क्रांतीनगर येथे किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

 • 11:03 AM

  पुणे - पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाचे 25 ते 30 कार्यकर्ते ताब्यात, खबरदारी म्हणून आंदोलकांवर पोलिसांची कारवाई.

 • 11:01 AM

  परळी - सलग सहाव्या दिवशीही मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोनल सुरुच, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा.

 • 10:37 AM

  जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त जळगावातील पिंप्राळा उपनगरात आज पांडुरंगाचा रथोत्सव, दुपारी 11.30 वाजता पूजा होणार.

 • 10:35 AM

  छत्तीसगड : वस्तीगृहातील जेवणातून २० विद्यार्थिनींना विषबाधा

 • 10:22 AM

  रायगड : पाली- खोपोली मार्गावर ट्रेलरचा अपघात, खालापूरजवळ पालीफाटा येथे ट्रेलर उलटला

 • 10:22 AM

  मुंबई: वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 • 10:14 AM

  पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाचे 6 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, खबरदारी म्हणून आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

 • 10:02 AM

  दिल्ली - येथील हर्ष विहार परिसरात मध्यरात्री 1 च्या सुमारास इमारत कोसळली, 2 ठार 3 जखमी

 • 09:54 AM

  टोरंटो - येथील एका रेस्टॉरंटबाहेर 9 जणांवर अज्ञाताचा गोळीबार, जखमींना केले रुग्णालयात दाखल.

All post in लाइव न्यूज़