ध्येयासक्तीतून यशोशिखर - प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या खडतर प्रवासाबद्दल... यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:29 AM2018-12-16T00:29:30+5:302018-12-16T00:38:31+5:30

लाईट नसल्याने मैत्रिणीच्या घरी बसून अभ्यास. सहा किलोमीटर चालत जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण. पार्ट टाईम नोकरी करत गुणवत्ता शिष्यवृत्त्या. शिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या

Yashoshishikhar - Pvt. (Dr.) Ashwani Patil's pilgrim journey ... Success Story | ध्येयासक्तीतून यशोशिखर - प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या खडतर प्रवासाबद्दल... यशोगाथा

ध्येयासक्तीतून यशोशिखर - प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या खडतर प्रवासाबद्दल... यशोगाथा

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक सावकाराला चांगलीच अद्दल घडविलीदोघांच्याही जीवनातील पहिली व शेवटचीच शैक्षणिक सहल ठरली.

लाईट नसल्याने मैत्रिणीच्या घरी बसून अभ्यास. सहा किलोमीटर चालत जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण. पार्ट टाईम नोकरी करत गुणवत्ता शिष्यवृत्त्या. शिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या खडतर प्रवासाबद्दल...

यशोगाथा
माझं मूळ गाव नंदगड (ता. खानापूर, जि. बेळगाव). वडिलांना पाच भाऊ, चार बहिणी. जमीन अत्यल्प. यामुळे सर्वच चुलते कामनिमित्त घराबाहेर पडले व काम मिळेल त्या-त्या ठिकाणी स्थायिक झाले. वडील मिरजेत आले. कपाटे रंगविण्यासाठी रोजंदारीवर काम करू लागले. घरी मी, बहीण, भाऊ, आई-वडील अशी पाच माणसे. तब्बल १३ वर्षे भाड्याच्या घरात राहिलो. चांगले-वाईट अनुभव आले. त्यानंतर कर्ज काढून वडिलांनी मिरजेत (सोनवणे प्लॉट, माजी सैनिक वसाहत) छोटासा प्लॉट विकत घेतला; पण आर्थिक अरिष्टात सापडलो. संसाराचा गाडा आणि आमचे शिक्षण यासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून आई मेसमध्ये चपत्या लाटायची. आम्ही भावंडेही घरकाम करीत जिद्दीने अभ्यास करू लागलो. आम्हाला नेहमीच चांगले गुण मिळायचे. चौथीत असताना संजय गांधीनगर येथील मराठी मुलांच्या शाळेतील जमदाडे सरांनी माझे व भावाच्या सहलीचे पैसे भरले होते. ती आमच्या दोघांच्याही जीवनातील पहिली व शेवटचीच शैक्षणिक सहल ठरली.

दहावी, बारावीला मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. वडिलांची इच्छा होती मी डी.एड्. करावे. मैत्रिणीच्या वडिलांना वाटायचे मी नर्सिंग करावे, पण माझ्या शिक्षणासाठी वडील घर विकणार होते. त्यामुळे मी आर्टस्लाच प्रवेश घेतला. बहिणीला मात्र सायन्समधून पदवी घेण्यास भाग पाडले. हुशार असूनही आर्थिक टंचाईमुळे भावाने अधर्वट शिक्षण सोडून वडिलांसोबत रोजंदारीवर जाणे पसंद केले.

बी. ए.च्या प्रथम वर्षाला शिवाजी विद्यापीठाची १०,००० रुपयांची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे पत्र मिळाले नाही. नंतर मी जेव्हा शिष्यवृत्तीचा चेक आणण्यासाठी विद्यापीठात गेले, तेव्हा तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी स्वत: शिष्यवृत्ती विभागात येऊन मला चेक दिला आणि शाब्बासकही दिली. पदव्युत्तर शिक्षण आमच्याच विद्यापीठात घेण्याचे त्यांनी सुचविले. त्यावेळी मी खूपच भारावून गेले. तो क्षण मला शिकायला उर्मी देणारा ठरला. ही शिष्यवृत्ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी रक्कम होती. सहा मिलोमीटर चालत जाऊन मी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण घेतले होते.

या पैशातून पहिली सायकल घेतली. राहिलेल्या पैशातून घरात लाईट व नळ कनेक्शन घेतले. पदवीचे शिक्षण मी डोळ्यांचा दवाखाना व सराफ पेढीवर काम करून पूर्ण केले. पदवीपर्यंतचा सर्व अभ्यास हा मैत्रिणीच्या घरी बसूनच केला. कारण आसरा म्हणूनच त्या चार भिंतीचे घर होते. भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे ऊन- पावसाच्या पाण्याला घरात थेट वाट मोकळीच होती.

पदव्युत्तर शिक्षणासाठी कोल्हापुरातील नामांकित राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वसतिगृहाचा खर्च न झेपवणारा होता. या खर्चासाठी मिरज महाविद्यालयातील मानसशास्त्रचे प्रा. संजय वार्इंगडे सरांनी हातभार लावला. एम.ए.लाही विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केली. यामुळेच खऱ्या अर्थांने माझ्या घरी प्रगतीचे वारे वाहू लागले. या पैशातून सिमेंटच्या खोल्या बांधल्या. लाईट, नळ कनेक्शन घेतले. शौचालय बांधले. पीएच.डी. साठी प्रवेश घेतला. यानंतर जीवनसाथीचा शोध सुरू झाला. योगायोगाने माझ्या परिस्थितीसारखाच संघर्ष करणारा दुर्गम भागातील उच्च शिक्षित डॉ. प्रकाश मुंज हे जीवनसाथीही मिळाले.

लग्नासाठी मला राजाराम कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ए. एस. परीट सरांनी आर्थिक मदत केली. आज मी व घरचे सर्व सदस्य आनंदी आहोत. बहिणीने बीएस.सी. नंतर डीएमएलटी केले. ती आता तिच्या पतीसोबत स्वत:ची दोन मेडिकल चालवत आहे. भावाचे जीवनही स्थिरावले आहे. हे सर्व मला शिक्षणाने दिले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणतात ते काही खोटे नाही.

सावकाराला चांगलीच अद्दल घडविली
घरासाठी वडिलांनी एका पतसंस्थेतून कर्ज काढले होते. हे कर्ज थकल्यामुळे नोटिसा येऊ लागल्या. हे कर्ज भागविण्यासाठी सावकाराकडून २० हजार रुपयांचे कर्ज काढले. ते व्याजासह परत करूनही त्यांनं आपला सावकारी गुण दाखविला. तो घर बळकावणार होता. मैत्रिणीच्या वकील भावाचा सल्ला घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडविली. शिक्षणामुळेच हे शक्य झाले.

शैक्षणिक प्रवास..
शिक्षण : एम.ए.पीएच.डी. (मानसशास्त्र)
नोकरी : सहायक प्राध्यापक, राजाराम कॉलेज (सहा वर्ष), के.एम.सी. कॉलेज (एक वर्ष), राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमधून शोधनिबंध प्रकाशित, वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लेखन, राष्ट्रीय, आंतररराराष्ट्रीय अधिवेशन, चर्चासत्रात शोधनिबंधांचे वाचन. पदवी व पदव्युत्तरसाठी शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती.


 

Web Title: Yashoshishikhar - Pvt. (Dr.) Ashwani Patil's pilgrim journey ... Success Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.