अमोल परचुरे
 
शूटिंग करताना जे प्रत्यक्षात नाही, तेही पडद्यावर ‘दाखवता’ येतं, सकाळ असेल तर रात्र करता येते, पंचेचाळिशीचा नायक पडद्यावर पंचविशीचा दिसू शकतो,  पुठ्ठ्याच्या डोक्यावरून वाहत्या टॅँकरभर पाण्याचा सिनेमात झावातासारखा रौद्र धबधबा करता येतो, सुटलेल्या पोटांवर जादू करून सिक्स पॅक चढवता येतात, मुंबईतल्या स्टुडिओत शूट झालेला सीन अमेरिकेतल्या लास वेगासचा आहे असं पडद्यावर भासवता येतं! - थोडक्यात काय वाट्टेल ते करता येतं. ‘बाहुबली-२’ पाहून पुन्हा तुमची बोटं तोंडात गेली असतील, तर ही जादू समजून घ्याच!
 
कुंतल देशाची राजकन्या अवंतिका जेव्हा राजहंसाचा आकार असलेल्या भल्यामोठ्या नौकेतून महिष्मती नगरीत प्रवेश करते, तेव्हा त्या नगरीचा महाकाय दिमाख बघून ती अवाक् होते, त्याचवेळी ५०० ते १००० रु पयाचं तिकीट काढून थेटरात बसलेला प्रेक्षकही अचंबित झालेला असतो. मी हे बाहुबली सिनेमाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असावं. प्रभासच्या एंट्रीचा सीनच असा आहे की एरवी टाळ्याही न वाजवणारा प्रेक्षक चक्क शिट्ट्या मारायला लागतो. जे आत्तापर्यंत हॉलिवूड सिनेमांमध्येच डोळे भरून पाहिलं, तसंच लार्जर दॅन लाइफ वगैरे बघितल्याचा आनंद भारतीय प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. आपण जे पडद्यावर पाहतोय तो आभास आहे, कॉम्प्युटर ग्राफिक्स आहेत हे माहीत असतानाही प्रेक्षक बाहुबली बघण्यात गुंगून जातो. ही किमया आहे राजामौली आणि त्याच्यासोबत काम केलेल्या १००० हून जास्त श्ऋ आर्टिस्ट यांची... आता हे श्ऋ आर्टिस्ट म्हणजे कोण? ते नेमकं काय करतात? श्ऋ म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट इंडस्ट्रीचा पसारा नेमका किती मोठा आहे? या सर्व प्रश्नांचा बाहुबलीच्या निमित्ताने घेतलेला हा एक धांडोळा.
आमीर खानचा ‘गुलाम’ सिनेमा प्रदर्शित झाला १९९८ साली... ‘गुलाम’मधली आमीर आणि दीपक तिजोरीची दस दस की दौड खूप गाजली. आमीर खानने नंतर मीडियाशी बोलताना सांगितलं की, त्याचे कुटुंबीय त्या स्टंटमुळे नाराज झाले. आमीरने एवढा धोका पत्करायला नको होता वगैरे वगैरे... 
- प्रत्यक्षात तो सीन क्र ोमा तंत्रज्ञान वापरून शूट झाला होता. त्या पूर्ण सीनचं शूटिंग सानपाडा रेल्वे कारशेडमध्ये तब्बल १५ दिवस सुरू होतं. त्यातला एक अख्खा दिवस आमीर खान उॠ (कॉम्प्युटर ग्राफिक्स) तज्ज्ञासोबत बसून होता, नेमकं शूट कसं होणार वगैरे सगळं समजून घेत होता. नंतर प्रसिद्धीसाठी आमीरने आपणच कसा स्टंट केला वगैरे कहाणी रंगवून सांगितली. पण इथे सांगायचा मुद्दा म्हणजे सिनेमात श्ऋ (व्हिज्युअल ग्राफिक्स) यशस्वीपणे वापरण्याची ती सुरुवात होती. त्याच वर्षी दिग्दर्शक शंकरचा ‘जीन्स’ रिलीज झाला आणि श्ऋ ने काय चमत्कार घडू शकतो याचा अद्भुत अनुभव त्याने भारतीय प्रेक्षकांना दिला. 
अगदी त्याच वर्षी म्हणजे १९९८ साली शाहरुखचा ‘डुप्लिकेट’ही रिलीज झाला. सिनेमा फार चालला नाही, पण डबल रोल असूनही दोन शाहरुखच्या मध्ये काळी रेषा नव्हती आणि दोन शाहरु ख एकमेकांशी हात मिळवतायत अशी तंत्राची जादूही प्रेक्षकांना दिसली. दादासाहेब फाळकेंनी पौराणिक सिनेमात केलेल्या जादुई करामती आणि पुढे १९३७ पासून बाबुभाई मेस्त्रींचे स्पेशल इफेक्ट्स हा प्रवास खऱ्याखुऱ्या कॉम्प्युटर इफेक्ट्सपर्यंत येऊन पोचला आणि आता ‘बाहुबली’मधून भारतीय फिल्ममेकर्सनी घेतलेली मोठी भरारी सगळं जग तोंडात बोटं घालून पाहतं आहे.
१९७५ साली आलेल्या ‘शोले’मध्ये ठाकूरचे हात लपवण्यासाठी बरेच जुगाड करावे लागले. २०१६ साली आलेल्या ‘वजीर’मध्ये मात्र अमिताभचे दोन्ही पाय श्ऋ तंत्राने गायब करता आले. थोडक्यात, श्ऋ जेव्हा नव्हतं, तेव्हाही लेखक-दिग्दर्शकाच्या कल्पना प्रत्यक्षात 
आणण्यासाठी जिवाचं रान करणारे डोकेबाज लोक होतेच. ‘अप्पूराजा’चं उदाहरण घ्या.. हात-पाय दुमडून शूटिंग करणारा कमल हसन आणि त्याच्या डोकॅलिटीला सलामच केला पाहिजे. आता श्ऋ ने कमल हसन, शंकर, राजामौली यांसारख्या दिग्दर्शकांना नवीन बळ मिळालं एवढंच... 
हळूहळू मग बॉलिवूडमध्ये स्पेशल इफेक्ट्स आणि स्टंट यांची युतीच झाली. भौतिकशास्त्रातील नियम बाद ठरायला लागले. आधी एकाच वेळेस दहा जणांना लोळवणारा हिरो सर्वशक्तिमान झाला. हवेतून झुलत्या हिरोच्या शरीराला बांधलेल्या केबल्स एडिटिंगमध्ये सहज काढता येतात हे लक्षात आल्यावर रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकाने या तंत्राचा पुरेपूर वापर केला. एकंदरीत सगळ्याच डिपार्टमेंटना स्पेशल इफेक्ट्सचा स्पेशल फायदा व्हायला लागला. जुन्या काळी गाडीत बसलेले नायक-नायिका आणि मागे हलता पडदा, त्याची आठवण व्हावी असं क्र ोमा तंत्रज्ञान जवळ जवळ प्रत्येक सिनेमात वापरलं जाऊ लागलं. यात शूटिंगचा वेळही वाचत होता आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन शूट करण्याची गरजही उरली नाही. 
‘भाग मिल्खा भाग’ सारख्या सिनेमात खच्चून भरलेलं स्टेडियम दाखवणं श्ऋ मुळे सहज शक्य होऊ लागलं. प्रियांका चोप्रा सध्या न्यू यॉर्कमध्ये व्यस्त असली तरी ‘दोस्ताना’सारख्या सिनेमात मुंबईच्या स्टुडिओमध्येच अमेरिकेतला इनडोअर भाग शूट झाला होता. वॉण्टेडमध्ये सलमानचे सिक्स पॅक्स असतील किंवा रा-वन मधली शाहरु खची लोकल ट्रेनमधली जादूई थरारक कसरत; मिर्झया आणि आता आगामी राबतासारख्या सिनेमांमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्सचा पुढचा टप्पा बघायला मिळतोय. 
आता श्ऋ मधला क्रि एशन हा भाग - म्हणजे प्रत्यक्ष शूटच्या वेळेस नसलेल्या गोष्टी पडद्यावर मात्र निर्माण करणं - याचाही वापर वाढतोय. 
बाहुबलीमधील भव्य-दिव्य महाल, उंचच उंच पुतळे हे सगळं श्ऋ च्या जादूतून निर्माण केलेलं क्रिएशनच आहे. अगदी काही वर्षांतच यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान आपल्याला भारतीय सिनेमांमध्ये बघायला मिळणार आहे. हॉलिवूडमध्ये ‘अवतार’सारखे सिनेमे एका भव्य स्टुडिओमध्ये, एकाच भल्यामोठ्या फ्लोअरवर शूट केले जातात. पूर्ण फ्लोअर हाच एक क्रोमा असतो आणि इनडोअर-आउटडोअर असा अख्खा सिनेमा तिथेच शूट केला जातो. आपल्याकडे हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये लवकरच ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. आता इतकं सगळं होत असताना, बाहुबलीसारख्या सिनेमाला विक्र मी यश मिळत असताना, भारतीय सिनेमा हॉलिवूडचा पल्ला कधी गाठणार, असे प्रश्न विचारले जातातच. हॉलिवूड सिनेमांवरील प्रेमामुळे असेल किंवा भारतीय सिनेमांविषयी असलेल्या अनास्थेमुळे काहीजणांच्या मनात असे विचार येतात. 
हॉलिवूडमध्ये श्ऋ वर काम करणारे अनेक तज्ज्ञ भारतीय असताना भारतात मात्र ‘अवतार’सारखे सिनेमे का बनू शकत नाहीत, अशीही शंका बऱ्याचवेळा विचारली जाते. याचं उत्तर समजून घेण्यासाठी आधी हॉलिवूड आणि आपला सिनेमा यांच्यातला आर्थिक फरक समजून घ्यावा लागेल. 
गुणवत्ता ठासून भरलेली असूनही आपला सिनेमा हॉलिवूडमधील तंत्रसामग्रीच्या तुलनेत बराच मागे आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे बजेट! आकडेवारीचा विचार केला तर २००९ मध्ये बनलेल्या अवतारचं बजेट १५ अब्ज रु पयांहूनही जास्त होतं, आणि त्यानंतर चार वर्षांनी बनलेल्या बाहुबली-द बिगिनिंगचं बजेट दोन अब्ज रु पये एवढं होतं. अवाढव्य बजेटमुळे उपलब्ध असलेल्या सर्वात प्रगत तंत्रांचा अवलंब करणं हॉलिवूडला सहज शक्य असतं. त्यामुळेच त्यांच्या सिनेमातील इफेक्ट्स हे अगदी ओघवते वाटतात. तिथपर्यंतचा पल्ला गाठायला भारतीय सिनेमाला अजून बराच वेळ लागेल, पण त्या दिशेने पावलं पडतायत हे नक्की. पण या सगळ्यात मराठी सिनेमा नेमका कुठे आहे? गेल्या ४-५ वर्षांचा विचार केला तर मोठ्या बजेटच्या अगदी सगळ्याच सिनेमांमध्ये श्ऋ चा वापर झालेला आहे. श्ऋ म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट. यात क्लीनअप, कलर करेक्शन, कॉम्प्युटर ग्राफिक्स, क्रिएशन अशा बऱ्याच गोष्टी असतात. 
एका मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. शिवजयंतीच्या मोठ्या बॅनरच्या पुढ्यात सीन होणार होता. सगळी तयारी झाली होती. कलाकार आपापल्या जागी उभे होते. कॅमेरा रोल होणार एवढ्यात दिग्दर्शकाच्या लक्षात आलं की बॅनरवर शिवजयंतीची तारीखच चुकीची लिहिली होती, मग आर्ट डायरेक्टरला झापून वगैरे झालं... आता काय करायचं असा पेच निर्माण झाला. बॅनरमध्ये दुरुस्ती करण्यात बराच वेळ गेला असता. शेवटी मग सीन तसाच शूट केला आणि श्ऋ च्या मदतीने नंतर बॅनरवर योग्य तारीख टाकण्यात आली. सिनेमा बघताना हा इफेक्ट कुणाच्या लक्षातच आला नाही. शूट करताना झालेल्या चुका सुधारता येणं हा श्ऋ चा खूप मोठा फायदा आहे. या प्रक्रि येला क्लीनअप असं म्हणतात. जुना काळ दाखवत असताना या क्लीनअपचा खूप उपयोग होतो. एखाद्या ऐतिहासिक सिनेमात चुकून विजेचा खांब दिसत असेल तर तो सहज काढून टाकता येतो. 
आता या क्लीनअपची दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. 
आत्तापर्यंत ३० पेक्षा अधिक मराठी सिनेमांसाठी ज्या कंपनीने श्ऋ केलं, त्या "छङ्मं्िरल्लॅ ढ्र७ी’२" चा सीईओ आणि एमडी अमेय गोसावीच्या माहितीनुसार, क्लीनअपच्या सुविधेमुळे काही मराठी दिग्दर्शकांमध्ये थोडी बेफिकीर वृत्ती दिसून येतेय. सेटवर झाल्या चुका तर होऊ देत, नंतर श्ऋ मध्ये सुधारता येतील. ही ‘देख लेंगे’ सवय श्ऋ कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरायला लागली आहे. मेकअप किंवा आर्ट डायरेक्टरच्या चुका सुधारताना बजेट वाढतं आणि अर्थातच निर्मात्याचं टेन्शनही वाढतं. पण हळूहळू चित्र बदलतंय. नव्या दमाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना तंत्राची व्यवस्थित जाण असल्यामुळे ते श्ऋ तज्ज्ञांना पटकथालेखनापासूनच सोबत ठेवतात. त्यामुळे श्ऋ चं काम नेमकं किती आहे याचं व्यवस्थित नियोजन करता येतं. ‘बघतोस काय मुजरा कर’ सारख्या सिनेमाच्या लिखाणापासून अमेयची टीम सोबत असल्यामुळे सिनेमाला फायदा झाला. 
२०१४ साली आलेल्या ‘बाजी’ या निखिल महाजन दिग्दर्शित सिनेमात तब्बल २०० इफेक्ट्स होते. त्याखालोखाल सुजय डहाकेच्या ‘फुंतरू’मध्ये स्पेशल इफेक्ट्सची कमाल बघायला मिळाली. निखिल महाजनच्या शब्दात सांगायचं तर सिनेमात किती इफेक्ट्स वापरले हे महत्त्वाचं नाही, तर ते किती प्रभावीपणे वापरले हे महत्त्वाचं ठरतं. थोडक्यात, कल्पकता, महत्त्वाकांक्षा आणि यशस्वी अंमलबजावणी हे समीकरण जुळून येणं अतिशय आवश्यक असतं. त्यासाठी दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, कॅमेरामन आणि श्ऋ आर्टिस्ट यांचा ताळमेळ अतिशय उत्तम असावा लागतो. तसा ताळमेळ सध्याच्या पिढीमध्ये दिसतोय ही मराठी चित्रपटांसाठी खूपच चांगली गोष्ट आहे... 
आगामी ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा पूर्णपणे चाळीमध्ये शूट झालेला असला, तरी त्यातील चाळीचा भाग हा इफेक्ट्सच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे. तर, दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक युद्धपटावरही सध्या काम सुरू आहे, त्यात खूप मोठ्या प्रमाणावर श्ऋ चा वापर बघायला मिळेल. मराठीतला हा पहिला भव्य ऐतिहासिकपट ठरेल अशी चर्चा आहे. पण एकंदरीत मराठीमध्ये श्ऋ साठी खर्चाचं गणित जुळवणं तसं कठीणच आहे. 
आता जर आकाशात मळभ असताना शूटिंग केलं आणि प्रत्यक्ष सिनेमात निरभ्र आकाश दाखवायचं असेल तर १० सेकंदाच्या सीनसाठी एक लाख रु पये खर्च येऊ शकतो. कारण श्ऋ चं काम फ्रेम्सवर अवलंबून असतं, आणि एका सेकंदात २४ फ्रेम्स असतात. यावरूनच अंदाज बांधता येतो की श्ऋ साठी किती खर्च येत असेल ते...
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या शाहरु खच्या ‘फॅन’ मध्ये तब्बल १२० मिनिटांच्या फुटेजमध्ये हिरोचं वय कमी करणं हे श्ऋ आर्टिस्टसाठी मोठं आव्हान होतं. फ्रेम्सचा हिशेब केला तर करोडो रु पये फक्त श्ऋ वर खर्च झाले असतील हे उघड आहे. 
अजय देवगणच्या ‘शिवाय’चं ८० टक्के शूटिंग हे क्र ोमा लावून झालं होतं. त्यांनतर ११० श्ऋ आर्टिस्ट ११ महिने त्यावर काम करत होते. आता तर जाहिरातींमध्येही क्र ोमा आणि स्पेशल इफेक्ट्सचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे रोजगाराची संधी खूप आहे, आणि स्पर्धाही प्रचंड वाढली आहे. याच स्पर्धेला तोंड देत मोठमोठ्या श्ऋ स्टुडिओजनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सवरही लक्ष केंद्रित केलं आहे. 
एवढं मात्र खरं की श्ऋ तंत्रानं मनोरंजन माध्यम विस्तारलं आहे, आणखी विस्तारणार आहे...
बाहुबलीसाठी जशा मोठ्या कंपन्या एकत्र आल्या तसे आणखी खङ्म्रल्ल३ श्ील्ल३४१ी२ झाले तर मनोरंजनही स्पेशल होऊ शकेल. 
तंत्राच्या बाबतीत दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू असलेला प्रवास प्रेक्षक म्हणून आपला अनुभव किती समृद्ध करतो याचीच आता वाट बघायची. 
 
व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी भारतात काम करणे खरंच जितका आनंददायी अनुभव होता तितकाच आव्हानात्मकही होता. यापूर्वी आमच्या टीमने मगाधिरासारखे चित्रपट केले असल्यामुळे त्याचा अनुभव गाठीशी होताच, पण बाहुबलीचं बजेट, त्याचा आवाका आणि तंत्रज्ञान याबाबतीत इतरांपेक्षा फारच वेगळा आहे. भारतीय प्रेक्षकांनी बाहुबली उचलून डोक्यावर घेतला यामध्येच त्याच्या व्हिज्युअल इफेक्ट्सला पावती मिळून जाते. माझ्या मतानुसार बाहुबलीचे यश पाहता भारतीय सिनेमामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सना आगामी काळात चांगले दिवस येतील. नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण, बजेट, उत्तम साधने जुळून आली तर बाहुबलीसारखे प्रकल्प आणखी होऊ शकतील. भारतीय सिनेमामध्ये याबाबत मी अत्यंत आशावादी आहे.
- पीट ड्रेपर, सहसंस्थापक, मकुटा व्हिज्युअल इफेक्ट्स
 
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)