डॉनल्ड ट्रम्पच्या ‘लोकप्रियते’चं रहस्य

By admin | Published: April 2, 2016 02:45 PM2016-04-02T14:45:31+5:302016-04-02T14:45:31+5:30

अमेरिकेत ढोबळपणे एक तृतीयांश मतदार डेमोक्रॅट पक्षाला, एक तृतीयांश मतदार नेहमीच रिपब्लिकन पक्षाला मत देतात. उरलेले एक तृतीयांश लोक ज्या पक्षाला मत देतील त्या पक्षाचा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो. हे उरलेले एक तृतीयांश म्हणजे कमी शिकलेले गौरवर्णी श्रमजीवी लोक. या लोकांची डॉनल्ड ट्रम्प यांना पसंती आहे, कारण त्यांची श्रीमंती. त्यांच्यामागे लॉबी नाही. त्यामुळे ते आपल्या हिताची धोरणं राबवतील, असं या वर्गाला मनापासून वाटतं.

The secret of Donald Trump's 'popularity' | डॉनल्ड ट्रम्पच्या ‘लोकप्रियते’चं रहस्य

डॉनल्ड ट्रम्पच्या ‘लोकप्रियते’चं रहस्य

Next
>- संहिता अदिती जोशी 
ऑस्टीन, टेक्सास
 
अमेरिकेत जसा सुशिक्षित, उदारमतवादी लोकांचा एक वर्ग आहे, तसा दुसरा एक मोठा वर्ग आहे श्रमजीवी आणि  कामगारांचा. सुबत्ता असणा:या भांडवलशाही देशात हा वर्ग एकेकाळी देश चालवणारा वर्ग होता. आजही अमेरिकेत श्रमांना प्रतिष्ठा असली तरीही दैनंदिन व्यवहारातल्या ब:याच गोष्टी चीनमधून येतात. शेतीच्या अवजड वस्तू, बोइंगची विमानं, काही प्रतिष्ठित ब्रँडच्या गाडय़ा अशा मोजक्या गोष्टींचं आता अमेरिकेत उत्पादन होतं. चीन आणि अन्य जगातून स्वस्त माल येतो. त्यामुळे अमेरिकेतला हा कामगारवर्ग संख्येने आक्र सला आहे. लोकशाहीमध्ये संख्या आक्र सणं म्हणजे राजकीय ताकदही कमी होणं. 196क् च्या दशकापासून अमेरिकेत कायदेशीर पद्धतीने वर्णभेदाला गुन्हा मानलं गेलेलं आहे. वर्णभेदाचे अवशेष अजूनही बाकी असले, तरीही कायद्याने त्यांना समान संधी उपलब्ध झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात शिक्षण, अधिकाराची पदं, नोक:या, व्यवसायात कृष्णवर्णीयांनी बरीच आघाडी घेतली आहे. यात भर पडली आहे वैध आणि अवैध मार्गाने अमेरिकेत येणा:या श्रमजीवी वर्गाची. शिक्षण, नोकरी, घर या सगळ्यांच्या संधींमध्ये बरीच स्पर्धा निर्माण झालेली आहे. श्रमजीवी वर्गाकडे मानाने जगण्यासाठी पैसे मिळवण्यासाठीच्या संधी आक्र सत आहेत. या असुरक्षिततेला ट्रम्प खतपाणी घालून मोठं करत आहेत.  
डेमोक्र ॅट पक्षाचे एक उमेदवार बर्नी सँडर्स समाजवादी विचारसरणीचे आहेत. सर्वांना परवडेल असं महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी नसलेल्यांना सामाजिक आधार (सोशल बेनिफिट्स) अशा प्रकारची त्यांची धोरणं आहेत. तरीही सँडर्सपेक्षा ट्रम्प यांना गो:या श्रमजीवी वर्गाकडून प्रचंड मोठा पाठिंबा आहे. विविध संस्थांनी केलेल्या पाहणीमधून, सध्या येत असलेल्या प्राथमिक मतदानांच्या निकालांमधून हे स्पष्ट दिसत आहे. बर्नी सँडर्सची प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन त्यांच्यापेक्षा दुप्पट लोकप्रिय आहे.  सँडर्स श्रमजीवी, कामगार, गरिबांच्या बाजूची धोरणं राबविण्याच्या योजना करूनही त्या वर्गात लोकप्रिय का नाहीत याची कारणंही महत्त्वाची आहेत.  श्रमजीवी वर्ग मोठय़ा प्रमाणावर धार्मिक ािश्चन आहे. अमेरिकेतल्या बहुतांश धार्मिक ािश्चनांना गर्भपात, समलैंगिक संबंधांना भिन्नलिंगी संबंधांएवढीच कायदेशीर आणि समाजमान्यता या गोष्टी खटकतात. अगदी शिकलेल्या धार्मिकांमध्येही गर्भपाताला नकार, समलैंगिकतेचा अस्वीकार, उत्क्रांती आणि महास्फोट हे वैज्ञानिक सिद्धांत न स्वीकारणं यांचं प्रमाण मोठं आहे. 
खिश्चनांमधला इव्हँजेलिकल पंथ अमेरिकेत खूप मोठा आहे. त्यांच्या (धर्माच्या) दृष्टीने, चांगलं माणूस असणं म्हणजे चांगली ािश्चन व्यक्ती बनणं आणि सगळ्यांना गर्भपात, समलैंगिकता या  पापांपासून वाचवणं. बहुतेकसे लोक धर्माच्या या शिकवणुकीच्या प्रभावाखाली असतात आणि इतरांच्या लेखी कट्टरपंथी बनतात. धर्माची अस्मिता बनते. बर्नी सँडर्स यांची धोरणं श्रमजीवी वर्गाच्या कल्याणाचा विचार करणारी असली तरीही त्यांच्या धर्माचे नियम मोडणारी आहेत. त्याचा मतपेटीवर परिणाम दिसतो. सामाजिक उतरंड कोणत्याही समाजात असतेच. भारतात जाती जन्माधारित असतात, त्या मोडल्याच पाहिजेत. कर्मानुसारही माणसांची सामाजिक उतरंड बनते. भरपूर पैसेवाले एका मातीत सगळ्यात वर असतात. दुस:या मातीमध्ये बुद्धीवादी, विचारवंत सगळ्यात वर असतात. बहुतांश श्रमजीवी लोक या दोन्ही उतरंडींमध्ये खालच्या स्थानावर असतात. आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या स्थानावर असला की माणसांचा अहं (इगो) सुखावतो. ज्या माणसांना सामाजिक-आर्थिक स्थान, बौद्धिक पातळी या कोणत्याच बाबतीत काहीही असुरक्षितता नसतात त्यांना आपल्यापेक्षा कोणी खालच्या पातळीवर असण्या-नसण्याचा फरक पडत नाही. 
अमेरिकेत गो:या, कमी शिक्षित वर्गाचाच्या स्मिता फुलवण्याचं काम ट्रम्प करत आहेत. या लोकांना ट्रम्प आवडण्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे त्याची श्रीमंती. वरवर वाचता ही गोष्ट विरोधाभासी वाटते. पण आपल्याकडे नाही का करण जोहर छापाचे श्रीमंतीचं अवास्तव प्रदर्शन करणारे सिनेमे सुपरहिट बनत! अमेरिकेत व्यावसायिक आपल्या लॉबी बनवून राजकारण्यांना अधिकृतपणो निवडणुकीसाठी पैसे पुरवू शकतात. ठरावीक प्रकारची धोरणं, कायदे व्हावेत याची ही किंमत असते. त्याला सुपरपॅक म्हणतात. उदाहरणार्थ, गर्भपातावर पूर्णपणो बंदी आणण्यासाठी चर्चकडून मोठय़ा प्रमाणावर पैसा ओतला जाऊ शकतो. सामान्यत: रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या मागे काही सुपरपॅक्स असतात; डेमोक्रॅट हिलरींच्या मागेही असा एक सुपरपॅक आहे. दोनच लोकांकडे सुपरपॅक नाहीत. डेमोक्र ॅट बर्नी सँडर्स आणि डॉनल्ड ट्रम्प. ट्रम्प अतिश्रीमंत लोकांपैकी एक आहेत. स्वत:चं एक जेट, एक हेलिकॉप्टर, एक यॉट, अनेक प्रासाद, न्यूयॉर्कशहरात ट्रम्प टॉवर नावाची उंच इमारत ट्रम्पकडे आहे; यावरून त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येईल. सामान्य लोक या श्रीमंतीवर भाळलेले आहेत, असं म्हणणं वस्तुस्थितीचं सरधोपट आकलन ठरेल. पण ट्रम्प यांच्यामागे कोणताही सुपरपॅक नाही. श्रीमंतांकडून पैसे घेऊन इतर लोक श्रीमंत, धनदांडग्यांसाठी धार्जिणो कायदे, धोरणं बनवली जातील अशी रास्त भीती सामान्य लोकांना आहे. ट्रम्प यांच्या  मागे कोणत्याही उद्योजकांची, धनदांडग्यांची लॉबी नाही. त्यामुळे ते आपल्या हिताची धोरणं राबवतील, असं या गो:या, गरीब वर्गाला मनापासून पटत आहे. 
मतपेटय़ांमधून याचा बराचसा प्रत्यय येत आहे. रिपब्लिकन प्रस्थापितांचे (काहीसे) लाडके मार्को रुबियो निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. ट्रम्प आणि क्रूझ यांच्या पत्नींबद्दल चित्रविचित्र ट्विट्स येत आहेत.  ट्रम्प यांनी सौ. क्रूझ यांच्याविरोधात सरळच लिहिलेलं आहे. सौ. ट्रम्प यांच्याविरोधात निनावी गरळ प्रसिद्ध झालं आहे. अतिकट्टर धार्मिक प्रदेशांत टेड क्रूझ यांना विजय मिळत आहे. धर्म आणि सुसंस्कृतपणा एकत्र नांदतात असं काही नाही! टेड क्रूझ सध्या दुस:या क्रमांकावर आहेत, आणि डॉनल्ड ट्रम्प यांचा  वारू उधळलेला आहे.
ही उमेदवारीसाठी असणारी शर्यत आहे. यांच्यातला विजयी उमेदवार बहुधा हिलरी क्लिंटन यांचा प्रतिस्पर्धी ठरेल. (बर्नी सँडर्स उमेदवारी जिंकण्याची शक्यता कमीच) आणि सध्याचे आकडे पाहता डॉनल्ड ट्रम्प हिलरी यांना मात देऊ शकतील, असं म्हणणं धाडसाचंच!  ट्रम्प यांचं वंशद्वेष्टं जहर, जाहीर वादावादीमध्ये तू खोटारडा आहेस, तुझा हात लहान आहे असली शाळकरी पातळी गाठणं, गर्भपात केलेल्या महिलांना त्या कृत्याची शिक्षा केली पाहिजे, असले तारे तोडणं चालू आहे.
- त्याचा परिणाम मतदानावर होईल. अर्थात,  आकडेवारी आणि पंडितांचे अंदाज काहीही असले तरीही प्रत्यक्ष निवडणुकांची मतमोजणी होईस्तोवर अमेरिकेतही समाजात दुफळी माजवणारा नेता सत्तेवर येणार नाही, अशी आशा करण्याखेरीज आपण काहीही करू शकत नाही.
 
‘हिस्पॅनिक लोक ड्रग-डीलर्स किंवा बलात्कारी असतात, नागरिक नसणा:या कोणत्याही मुस्लिमाला अमेरिकेत पाऊल ठेवू देणार नाही,’ अशा विधानांमधून ट्रम्प अमेरिकेत प्रादेशिक अस्मिता फुलवत आहेत. (मराठी लोकांना दोन्ही सेना आठवायला हरकत नाही.) जी गोष्ट कोणत्याही वंशाच्या सुशिक्षित लोकांना टाकाऊ वाटते तीच गोष्ट कमी शिकलेल्या लोकांना स्पृहणीय वाटत आहे. अगदी रिपब्लिकन पक्षातल्या प्रस्थापितांनाही त्याची ही विधानं निषेधार्ह वाटतात. अशा विधानांमुळे पुढची चारी वर्षं राष्ट्राध्यक्षपद डेमोक्र ॅटांकडे जाईल अशी भीती वाटते. प्राथमिक फेरीच्या निवडणुका सुरू होण्याच्या काही काळ आधीपासून ट्रम्पची ही आगीशी खेळण्याची सर्कस सुरू झालेली आहे. अनेक महिने त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न त्यांनी केला. आताचे निकाल बघता डॉनल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होण्याची बरीच शक्यता दिसत आहे. याची अटलता लक्षात आल्यावर पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत; पण आता हा प्रयत्न म्हणजे लोकप्रियतेचा समुद्र केरसुणीने मागे लोटण्याचीच धडपड आहे.
 
(लेखिका भौतिक शास्त्रज्ञ असून, 
दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास आहेत)
sanhita.joshi@gmail.com

Web Title: The secret of Donald Trump's 'popularity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.