रणजित सिंग, आरती पाटील ठरले विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:37 AM2017-08-14T05:37:04+5:302017-08-14T05:37:07+5:30

सेनादलाचा रणजित सिंग आणि नाशिकची आरती पाटील यांनी २८व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या गटात विजेतेपद जिंकले.

Ranjit Singh, Aarti Patil won the winners | रणजित सिंग, आरती पाटील ठरले विजेते

रणजित सिंग, आरती पाटील ठरले विजेते

googlenewsNext

ठाणे : सेनादलाचा रणजित सिंग आणि नाशिकची आरती पाटील यांनी २८व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या गटात विजेतेपद जिंकले. रणजित सिंगने २१ किलो मीटर शर्यत १ तास १० मि. ६ सेकंदांत, तर आरती पाटीलने १५ किलोमीटरची शर्यत ५७ मिनिटांत पूर्ण केली. यंदा मॅरेथॉनमध्ये ‘स्मार्ट ठाण्या’साठी तब्बल २२ हजार स्पर्धकांनी भाग घेतला.
पालिकेच्या मुख्यालयापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नंतर, पालकमंत्र्यांच्या हस्ते-महापौरांच्या अध्यक्षतेखाली रणजित सिंग व आरती पाटील या विजेत्यांना अनुक्रमे रोख ७५ हजार व ५० हजार रोख मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
दरवर्षी या स्पर्धेत नाशिकने आपले वर्चस्व कायम ठेवले होते. त्यामुळे माझ्यावर दडपण होते. पण, यंदाही नाशिककर म्हणून वर्चस्व निर्माण करता आले, याचे समाधान आहे. मी मूळ कोल्हापूरची. ठाण्यात पहिल्यांदाच धावून स्पर्धा जिंकली. धावताना किती अंतर पार केले, याची माहितीच मिळत नव्हती. धावताना थोडे खड्डे जाणवले.
- आरती पाटील
सप्टेंबर महिन्यात होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी धावपटू म्हणून मी तयारी करत आहे. पुण्याकडून मी एकटाच आलो होतो. ठाण्यात प्रथम धावण्याची संधी मिळाली आणि ही स्पर्धा जिंकल्याचा आनंद आहे. मात्र, येथे गोव्यातील १:०५:५७ चा वेळेचा विक्रम मोडता आला नाही.
- रणजित सिंग
>निकाल
२१ किमी (पुरु ष गट) : रणजित सिंग (प्रथम), पिंटू यादव (द्वितीय), सचिन गमरे, अलिबाग (तृतीय), तानाजी नलावडे (चतुर्थ), महेश वढाई (पाचवा), शेषराव राऊत, नागपूर (सहावा).
१५ किमी (महिला गट) : आरती पाटील, भोसले मिलिटरी कॉलेज, नाशिक (प्रथम), वर्षा भवारी, मुंबई पोलीस (द्वितीय), ज्योती चौहान, संग्राम प्रतिष्ठान पुणे (तृतीय), गीता वाटगुरे, गडचिरोली, (चतुर्थ), रिशू सिंग, भोसले मिलिटरी कॉलेज, नाशिक (पाचवी), प्रियंका भोपी, शिवभक्त विद्यामंदिर, बदलापूर (सहावी).
>ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये कलाकार-खेळाडूंची हजेरी
महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत अनेक कलाकार-खेळाडूंनी या मॅरेथॉनला हजेरी लावली. गतवर्षापेक्षा यंदा या स्पर्धेत स्पर्धकांची संख्या वाढल्याचा दावा महापालिकेने केला. विशेष म्हणजे, रणजित सिंग व आरती पाटील प्रथमच ठाण्यात आले आणि पहिल्यांदाच ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धावून त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले, तसेच १८ वर्षांखालील १० किलोमीटर मुलांच्या स्पर्धेत पहिले पाचही विजेते पालघर जिल्ह्यातील आहेत.
>पालकमंत्रीही धावले
या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील मानाच्या ‘रन फॉर फन’ या गटात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी धावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या वेळी त्यांच्यासोबत आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आदी धावल्याने या स्पर्धेत रंगत आली. या स्पर्धेला महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

Web Title: Ranjit Singh, Aarti Patil won the winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.