पेला अर्धा भरला आहे, की सरला आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:00 AM2018-07-22T03:00:00+5:302018-07-22T03:00:00+5:30

पेला अर्धा भरला आहे एवढेच लक्षात घेणारा माणूस स्वत:च्या मर्यादा लक्षात घेत नाही, समस्या नाकारतो त्यामुळे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही. पेला अर्धा रिकामा आहे एवढेच पहाणारा माणूस सतत न्यून शोधत राहतो, त्यामुळे निराश होतो. - मग नेमके काय करावे?

mindfulness helps us to accept things as it is! | पेला अर्धा भरला आहे, की सरला आहे ?

पेला अर्धा भरला आहे, की सरला आहे ?

Next
ठळक मुद्देकोणत्याही तीव्र भावनिक प्रतिक्रि येमुळे निष्क्रियता येऊ शकते. माइंडफुलनेस माणसाला निष्क्रिय बनवेल असा काहीजण आक्षेप घेतात, पण हे चुकीचे आहे. योग्य प्रकारे केलेला माइंडफुलनेसचा अभ्यास माणसाला अधिक सक्र ीय करतो.माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणी परिसरात, शरीरात आणि मनात जे काही घडते आहे, ते जाणत राहणे आणि त्याचा स्वीकार करणे होय. स्वीकार करताना त्यावर कोणतीही प्रतिक्रि या करणे टाळायचे असते.

डॉ. यश वेलणकर

असे म्हणतात की ‘पेला अर्धा भरला आहे’ आणि ‘पेला अर्धा सरला आहे’ यातील कोणत्या गोष्टीला महत्व देतो त्यानुसार माणसाची वृत्ती आणि भावना ठरत असतात. खरं म्हणजे ही दोन्ही विधाने एकाच वेळी खरी असतात. पेला अर्धा भरलेला असतो त्यावेळी तो अर्धा रिकामा असतोच. माणूस त्याकडे कसे पाहतो त्यावर त्याची मानसिकता ठरत असते.  पेला अर्धा भरला आहे असे म्हणणारा सकारात्मक दृष्टीने पाहतो त्यामुळे तो आनंदी,उत्साही राहू शकतो असे मानले जाते. याउलट पेला अर्धा रिकामा आहे याला अधिक महत्व देणारा माणूस निराशावादी आहे असे मानले जाते.
माइंडफुलनेसचे तत्वज्ञान मात्न असे लेबल लावणे नाकारते. अशी लेबल्स भावनिक प्रतिक्रि येमुळे लावली जातात आणि कोणतीही भावनिक प्रतिक्रि या टाळण्याचे प्रशिक्षण माइंडफुलनेसमध्ये दिले जाते.
आपल्या मेंदूतील अमायग्डाला नावाचा भावनिक मेंदूचा भाग सतत प्रतिक्रि याच करत असतो. अशी प्रतिक्रि या करत राहण्याची सवय अधिक वाढली तर अमायग्डाला अतिसंवेदनशील होतो आणि त्यामुळे ओसीडी(डउऊ), अतिचिंता, पॅनिक अ‍ॅटॅक असे त्नास होऊ लागतात. त्यामुळे मनात सतत भीतीदायक विचार येतात, छातीत धडधडते, अस्वस्थ वाटत राहते. माइंडफुलनेसच्या नियमित अभ्यासाने अमायाग्डलाची वाढलेली संवेदनशीलता कमी होते. रोज वीस मिनिटे असे दोन महिने नियमितपणे माइंडफुलनेसचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
माइंडफुलनेसच्या अभ्यासामध्ये शरीरावरील संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करणे, त्यांना प्रतिक्रि या न करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. पॅनिक अ‍ॅटॅक येतो, त्यावेळी छातीत धडधडू लागते, त्याला माणूस घाबरतो आणि या भीतीमुळे धडधड अधिकच वाढते. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी माइंडफुलनेस उपयुक्त ठरते. छातीतील धडधड ही एक संवेदना आहे, तिला प्रतिक्रि या न करता म्हणजे घाबरून न जाता ती जाणत राहिले तर हे दुष्टचक्र थांबते. पॅनिक अ‍ॅटॅकचा त्नास कमी होतो. अकारण चिंता,मंत्नचळ असे सर्व मानसिक त्नास माणसाला निष्क्र ीय करतात, ते त्नास कमी झाले की निष्क्रि यता कमी होते.
शरीरातील संवेदनांना प्रतिक्रि या न करता त्या जाणत राहणे हा जसा माइंडफुलनेसचा एक अभ्यास आहे तसाच आयुष्यात घडणारा घटनांना प्रतिक्रि या न करता त्यांचा स्वीकार करणे हादेखील माइंडफुलनेसचा एक अभ्यास आहे. कोणत्याही घटनांवर तीव्र प्रतिक्रि या देण्याच्या सवयीमुळे भावनांची तीव्रता अकारण वाढते, छोट्या छोट्या घटनांनी माणसे निराश होतात. ही निराशा आणि त्यामुळे येणारे डिप्रेशन टाळायचे असेल तर घडणार्‍या घटनांवर तीव्र प्रतिक्रि या देण्याची सवय कमी करायला हवी. घटना मान्य करायची, वास्तवापासून पळायचे नाही आणि झालेली घटना ही खूपच चांगली किंवा खूपच वाईट अशी प्रतिक्रि या द्यायची नाही.
 एका सजग शेतकर्‍याकडे एक उमदा घोडा होता. एक दिवस तो घोडा हरवला. ही बातमी कळताच शेतकर्‍याचे मित्न त्याच्याजवळ खेद व्यक्त करू लागले. परंतु शेतकर्‍याने यावर कोणतीही प्रतिक्रि या दिली नाही. त्याच्यासाठी ती घटना चांगली किंवा वाईट नसून केवळ एक वस्तुस्थिती होती. तो म्हणाला, घोडा हरवला,हे सत्य आहे पण ते चांगले की वाईट आपण ठरवू शकत नाही. 
काही दिवसानंतर तो घोडा परत आला तेव्हा त्याच्याबरोबर जंगलातील एक घोडीसुद्धा होती. यावर त्या शेतकर्‍याच्या मित्नांनी त्या शेतकर्‍याला घोडी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.परंतु यावेळीसुद्धा शेतकर्‍याने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रि या दिली नाही. ही नवीन घोडी जंगली होती. त्यामुळे त्या शेतकर्‍याचा मुलगा तिला शिकवू लागला. ते करताना एक दिवस तो मुलगा पडला आणि त्याचा पाय मोडला. 
पुन्हा त्या शेतकर्‍याचे मित्न तीव्र शोक करू लागले. परंतु त्या शेतकर्‍याने यावरही काही प्रतिक्रि या दिली नाही. 
- आता मात्न त्या शेतकर्‍याचे मित्न त्याला वेडा समजू लागले. शेतकर्‍याच्या मुलाचा पाय मोडलेला असूनसुद्धा त्या शेतकर्‍याला वाईट कसे वाटत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या मुलाच्या पायांवर उपचार सुरु असतानाच शत्नू राज्याच्या सेनेने त्या गावावर हल्ला केला आणि सर्व तरूण मुलांना सेनेत भरती करण्यासाठी पकडून नेले. परंतु शेतकर्‍याच्या मुलाचा पाय मोडलेला असल्याने त्याला शत्नूसेनेने पकडले नाही.
- या शेतकर्‍यासारखेच जे काही घडले असेल त्याला प्रतिक्रि या न करता त्याचा स्वीकार करण्याची सवय आपण लावून घेऊ शकतो. माणसे आयुष्यात घडणार्‍या छोट्या छोट्या घटनांना तीव्र प्रतिक्रि या देऊन मनस्वास्थ्य बिघडवून घेतात. तीव्र आनंदाची प्रतिक्रि या हर्षोन्माद घडवते . अशा उन्मादामुळे निष्क्रि यता येते. तीव्र दुखर्‍ औदासिन्यामुळे निष्क्रि यता आणते. ही दोन्ही टोके टाळायची असतील तर जे काही घडले आहे, घडत आहे त्याचा स्वीकार करायचा. पण ते फारच वाईट आहे किंवा फारच चांगले आहे अशी प्रतिक्रिया टाळायची.
 याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅप्टन कूल धोनी होय. सामना जिंकला किंवा हरला तरी त्याची प्रतिक्रि या अतिशय शांत असायची. अजूनही तशीच असते. वल्र्डकप जिंकल्यानंतरही तो शांत होता. एखादी अटीतटीची मॅच हरल्यानंतर देखील त्याने कधी आक्रस्ताळेपणा केल्याचे दिसले नाही. अशी मानसिकता असल्यानेच त्याने स्वतर्‍ला सतत सक्र ीय ठेवून, रोजचा सराव कायम ठेवून स्वतर्‍ला शारीरिकदृष्ट्या तंदुरु स्त ठेवलेच पण संघाचा परफॉर्मन्सही उंचावत नेला.
 पेला अर्धा भरला आहे एवढेच लक्षात घेणारा माणूस  मर्यादा लक्षात घेत नाही, समस्या नाकारतो त्यामुळे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही. 
पेला अर्धा रिकामा आहे एवढेच पहाणारा माणूस सतत न्यून शोधत राहतो, त्यामुळे निराश होतो.
सजग व्हायचे म्हणजे पेला अर्धा भरला आहे आणि अर्धा रिकामा आहे ही वस्तुस्थिती जाणायची आणि तीव्र प्रतिक्रि या न करता तिचा स्वीकार करायचा.
- असे केल्याने निष्क्रि यता येत नाही, ध्येयाच्या दिशेने वाटचाल चालू राहते.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे 
अभ्यासक आहेत.)

Web Title: mindfulness helps us to accept things as it is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.