मी टू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:00 AM2018-10-14T06:00:00+5:302018-10-14T06:00:00+5:30

नाना पाटेकरपासून सुरुवात झाली. त्यानंतर एकामागून एक लेखक, पत्रकार, गायक..अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप झाले. प्रसारमाध्यमांना रोज नवीन मसाला मिळतो आहे. मात्र त्यामुळे या मोहिमेच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष होऊ नये.

Me Too | मी टू

मी टू

Next
ठळक मुद्देमी टू या मोहिमेमध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं गोवली गेल्याने सनसनाटी वातावरण तयार झालं आहे.

- सुनील तांबे


नाना पाटेकरपासून सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपट, पत्रकारिता या क्षेत्रातील अनेक हस्तींना आरोपांना सामोरं जावं लागत आहे. काही व्यक्तींनी माफी मागितली, काही व्यक्तींनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर काहींनी साफ इन्कार केला आहे. मूठभर व्यक्तींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यौन शोषण वा छळ कशाला म्हणायचं, याबाबत कायदा पुरेसा स्पष्ट आहे. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर सत्तेचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरु द्ध स्पर्श करणं वा लैंगिक कृतीसाठी भाग पाडणं म्हणजे यौन शोषण वा छळ. स्त्री, पुरु ष, उभयलिंगी (ट्रान्सजेंडर) असा भेद त्यामध्ये नाही. उदाहरणार्थ देहविक्रय करणाऱ्या व्यक्तीलाही तिच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कृती करायला कोणीही भाग पाडू शकत नाही वा देहविक्र य करणारी व्यक्ती आहे म्हणून तिचा अपमान, पाणउतारा वा बदनामी करणं हे संबंधित कायद्याचं उल्लंघन आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा हा यातला कळीचा मुद्दा आहे.
आपण देत असलेल्या शिव्या, एकमेकांना दिली जाणारी दूषणं अर्थात आपली भाषा, पुरु षप्रधान असते. कारण आपण पुरु षप्रधान समाजात वाढलो आहोत आणि राहात आहोत. आपल्या समाजातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सत्ता सामान्यत: पुरु षांच्या हाती आहे. या समाजात स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला मान्यता नाही. कामप्रेरणा प्रत्येक सजीवामध्ये असते. माणसांमध्ये काम हा भाव आहे. तो विविधप्रकारे व्यक्त होतो. लैंगिक आकर्षण निकोप आरोग्याचं लक्षण आहे. डेटिंग हा प्रकार आपल्याकडे रु ळलेला नाही. दोन तरु ण मुलं एकमेकांबद्दलचं आकर्षण व्यक्त करण्यासाठी भेटण्याचं ठरवतात. चित्रपट वा नाटकाचा आनंद लुटणं, सहलीला जाणं, उद्यानात विहार करणं असे डेटिंगचे अनेक प्रकार असू शकतात. यावेळी स्पर्श करणं, आलिंगन, चुंबन वा अन्य प्रकारे आपल्या भावना व्यक्त करणं यामध्ये दोन व्यक्तींच्या कल्पना, अपेक्षा, मागण्या वेगवेगळ्या असू शकतात. असा विसंवाद निर्माण झाल्यावर एका व्यक्तीने दुसºया व्यक्तीवर लैंगिक छळाचा वा शोषणाचा आरोप करणं गैर आहे. प्रेम व्यक्त करण्याचे वा मागणी घालण्याचे शिष्टाचार आपल्या समाजात रु जलेले नाहीत. कारण आपला समाज मूलत: ग्रामीण आहे. मात्र गावातील नैतिकतेचा काबू आपल्यावर राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या समाजात एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ले वा खून होतात. सत्तेचा वापर करून स्त्रीचं शोषण करणं आपल्या समाजात सामान्य बाब मानली जाते.
मी टू ही मोहीम अमेरिकेत सुरू झाली. या मोहिमेला तिथे प्रतिसाद मिळू लागला. भारतातील अभिजन म्हणजे उच्चवर्गीय, उच्चवर्णीय समाजातील महिला या मोहिमेत सक्रिय झाल्या. ते स्वाभाविकही होतं. आपली अंगभूत कौशल्यं, बुद्धिमत्ता, गुण यांच्या आधारावर समाजात स्थान मिळवण्याची आकांक्षा या समाजातील महिलांना अधिक असते. स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांनी जोडलेल्या व्यक्तींचा- स्त्री, पुरु ष आणि उभयलिंगी, समाज ही आकांक्षा आता सर्वत्र मूळ धरू लागली आहे. अमेरिका वा पश्चिम युरोपातील तिचं स्वरूप वेगळं आहे आणि आशिया-आफ्रिका खंडातील स्वरूप वेगळं आहे. उदाहरणार्थ ज्यूलियन असांजेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ज्या महिलेने तक्रार केली ती स्वत:च्या इच्छेने त्याच्याबरोबर रत झाली होती. मात्र कंडोम वापरण्याचा तिचा आग्रह असांजेने धुडकावून लावला म्हणून तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कुणाबरोबर, कुठे आणि कसा सेक्स करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्त्रीला आहे. त्यामुळे संबंधित देशातील कायद्यानुसार असांजे बलात्कारी ठरतो. विकीलिक्सद्वारे जगातील अनेक बड्या राष्ट्रप्रमुखांची झोप उडवणाºया असांजेला खोड्यात अडकवण्यासाठी हे प्रकरण उकरून काढण्यात आलं या आरोपात तथ्य आहे. बलात्कार, लैंगिक शोषण यांच्या कायदेशीर व्याख्या देश-संस्कृती याप्रमाणे बदलतात. जगातील आणि भारतातील स्त्री-पुरु षांच्या नैसर्गिक प्रेरणा त्याच आहेत मात्र अमेरिकेत, पश्चिम युरोपात औद्योगिक संस्कृती आहे तर भारतात आजही ५० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहाते. त्यामुळे तेथील पुरु षप्रधान समाजरचना आणि आपल्याकडील पुरुषप्रधान समाजरचना यामध्ये फरक आहे.
परदेशी भांडवल आपल्याला हवं आहे. परदेशी भांडवलासोबत परदेशी मूल्यंही येतात. मायक्र ोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, पेप्सी, कोका-कोला यापैकी कोणत्याही कंपनीच्या भारतातील कार्यालयात वा कारखान्यात गेलात तर तिथे स्त्री-पुरुष संबंध अधिक निकोप असतात. कारण लैंगिक शोषण वा छळ म्हणजे काय याची माहिती प्रत्येक कर्मचारी व कामगाराला देणं हे व्यवस्थापनाचं कर्तव्य समजलं जातं. कुणा व्यक्तीला लैंगिक शोषणाबाबत तक्र ार करायची असेल तर त्याची पद्धत, प्रक्रि या व यंत्रणा काय आहे याचीही माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर वा कार्यालयात दिलेली असते. काही भारतीय कंपन्यांमध्येही ही पद्धत राबवली जात आहे.
मी टू या मोहिमेमध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं गोवली गेल्याने सनसनाटी वातावरण तयार झालं आहे. नाना पाटेकरनंतर सिद्धार्थ भाटियावर आरोप झाले. त्यामागोमाग आलोकनाथचं नाव आलं. काही लेखकांची नावंही झळकली. एकामागून एक नावं झळकत असल्याने, रोज नवीन मसाला प्रसारमाध्यमांना मिळतो आहे. मात्र त्यामुळे या मोहिमेच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे. महिलांचा आत्मसन्मान समाजामध्ये म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रु जला पाहिजे, त्यासाठी दोषी व्यक्तीने (स्त्री असो की पुरुष) प्रायश्चित घ्यायला हवं वा शक्य असल्यास तिला सजा व्हायला हवी किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वातील अनिष्ट बाजू प्रकाशात यायला हव्यात. असं झालं तर समाजातील स्त्री-पुरु ष सहजीवन अधिक निकोप होण्याची शक्यता आहे. पुरु षसत्ताक व्यवस्थेमध्ये वाढलेल्या कोणत्याही पुरु षाकडून असे प्रमाद घडलेले असतील कारण ते प्रमाद आहेत हेच त्यांना माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत पुरुषांनी- सत्य-असत्यासी मन केले ग्वाही नाही मानियेले बहुमतां, हा बाणा स्वीकारून आपल्या चुकीबद्दल माफी मागणं, पश्चाताप व्यक्त करणं, नैतिक जबाबदारी स्वीकारणं हा सर्वोत्तम आणि इष्ट मार्ग आहे.

मूळ मुद्दा सोडून
होते मीडिया ट्रायल

भारतातीलच नाही तर अमेरिकेतल्या चित्रपट उद्योगातही महिलांचं शोषण केलं जातं. चित्रपट उद्योगात गुंतवला जाणारा पैसा वित्तीय संस्थांमधून येतो की गुन्हेगारी जगतातून, यावर चित्रपट उद्योगाचं स्वरूप, कामाच्या पद्धती, शिस्त, संस्कृती आकार घेते. ही बाब कोणत्याही उद्योगाला लागू होते. आपल्याकडचे बहुतेक उद्योग, विशेषत: मनोरंजन उद्योग (यामध्ये वर्तमानपत्रं, टेलिव्हीजन चॅनेल्स, स्पेशल इफेक्ट, चित्रपटनिर्मिती, जाहिराती इत्यादींचा समावेश होतो) एका कुटुंबाच्या मालकीचे आहेत. त्याचे बरे-वाईट दोन्ही परिणाम आहेत. सर्वात मोठा फरक असा की कुटुंबाच्या हाती असलेल्या उद्योगांची आचारसंहिता अलिखित असते तर जॉइंट स्टॉक कंपन्यांची विशेषत: परदेशी कंपन्यांची आचारसंहिता लिखित असते. भारतातील मनोरंजन उद्योगामध्ये लैंगिक शोषण, छळ यासंबंधात पुरेशी जागृती नाही. कायद्याची माहितीही नसते. यासंबंधात कोणाकडे तक्रार करायची, कोणी चौकशी करायची, चौकशी कशी करायची यासाठी कोणतीही यंत्रणा नसते, असली तर त्याची माहिती चित्रपटकर्मींना नसते. त्यामुळे या प्रकारच्या प्रकरणात मीडिया ट्रायल म्हणजे प्रसारमाध्यमांद्वारे खटले चालवले जातात. हे अर्थातच गैर आहे. आरोप करणाऱ्या व्यक्तीचं चारित्र्य, हेतू यावर शंका घेतल्या जातात. ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला आहे तिचं व्यक्तिमत्त्व, गुण, संवेदनशीलता, सामाजिक कार्य, समाजातील स्थान यावर चर्चा केली जाते. मूळ मुद्द्याला सोडून प्रसारमाध्यमं असे खटले चालवतात.
मी टू ही मोहीम सामाजिक माध्यमांद्वारे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक इत्यादी, चालवली जात आहे. या माध्यमांवर व्यक्त होण्यावर कोणाचेही निर्बंध नसतात. ही या माध्यमाची खासियत आहे. एखादी बातमी वा मजकूर वा लेख वा पत्रक वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी इत्यादी प्रसारमाध्यमांकडे दिलं तर त्याची सत्यासत्यता पडताळण्याचं काम ही प्रसारमाध्यमं करतात. मजकुराचं संपादन केलं जातं. सोशल माध्यमांबाबत हे शक्य नाही. मला जे म्हणायचं आहे ते मी प्रसारित करू शकतो. या माध्यमांचा गैरवापर अर्थातच होतो. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अफवा पसरवून डवरी गोसावी समाजाच्या कुटुंबाला ठार मारण्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे. खोट्या बातम्या वा माहिती प्रसारित करण्यासाठी, हिंसाचार घडवण्यासाठी या माध्यमांचा वापर आपल्या देशात ठिकठिकाणी सर्रासपणे केला जातो.

(लेखक स्वतंत्र पत्रकार आहेत.)

suniltambe07@gmail.com

Web Title: Me Too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.