भारत : ताठ आणि उंच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 06:36 PM2017-12-16T18:36:26+5:302017-12-17T06:39:39+5:30

प्रत्येकाला हे जाणवतं आहे, की भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय. काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून तुमच्या वाटेचे मासे उचलून!

India: Erect and tall | भारत : ताठ आणि उंच

भारत : ताठ आणि उंच

googlenewsNext

- मेघना ढोके 

प्रत्येकाला हे जाणवतं आहे, की भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय.
काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे
आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून
तुमच्या वाटेचे मासे उचलून! लोकांनाही वाटतंय की हे सोपं आहे,
सहज मिळतं आहे तर घ्यावं. लोकही सोपी उत्तरं शोधू लागले आहेत.
सोप्या उत्तरांनी जटिल प्रश्न सुटतील असं त्यांना वाटू लागलं आहे.
पण अस्वस्थ भवतालात, गरगरत्या उधाणात अशा सोप्या उत्तरांनी
योग्य, शाश्वत दिशा सापडत नाही.

सुरुवातीला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. काही वर्षांपूर्वी भारतावर त्सुनामी घोंघावत आली होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर ती येऊन धडकली. तिथं मदतकार्य सुरू करणं, साधनसामग्री पोहचवणं यासाठी आमची यंत्रणा कामाला लागली होती. आणि या त्सुनामीत जीव गमावलेल्या माणसांची यादी माझ्या हातात होती. मृतांची नावं होती. आणि माझ्या लक्षात आलं की, या बेटांवर राहणाºया आदिवासी लोकांपैकी कुणाचंच नाव या यादीत नाही. आदिवासींपैकी कुणी या संकटाला बळी पडलेलं नाही. हे कसं? याचं आश्चर्य वाटून चौकशी केली, तेव्हा एकानं मला सांगितलं. ‘मिस्टर गांधी, त्सुनामी येते तेव्हा समुद्राला प्रचंड उधाण येतं, प्रचंड प्रमाणात मासे बाहेर फेकले जातात. किनारपट्टीवर इतस्तत: विखुरलेले दिसतात. त्यावरून आदिवासी समुद्राच्या एकूण रागरंगाचा अंदाज बांधतात, नागरी माणसांना हे माहिती नसतं. त्सुनामी येते, समुद्र प्रचंड खवळतो, पोटात आहे नाही ते माशांसह बाहेर फेकतो. मासे असे बाहेर फेकले जात असताना नागरी, शहरी माणसं ते मासे गोळा करायला समुद्राकडे धावली आणि ही आदिवासी माणसं मात्र डोंगरांच्या दिशेनं निघाली. अनेकांनी शहरी लोकांना सांगितलं की समुद्र खवळलाय, पाण्यात जाऊ नका. लांब रहा. मराल. पण शहरी माणसांनी त्यांचं ऐकलं नाही. ते समुद्राच्या दिशेने जात राहिले, पाण्याजवळच थांबले. आदिवासी सुरक्षित जागी निघून गेले. म्हणूनच या मृतांच्या यादीत एकाही आदिवासी माणसाचं नाव नाही.’
- एक उदारमतवादी माणूस म्हणून मला त्यावेळी जे वाटलं होतं तेच आज वाटतं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय. काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून तुमच्या वाटेचे मासे उचलून! लोकांनाही वाटतंय की हे सोपं आहे, सहज मिळतं आहे तर घ्यावं. लोकही सोपी उत्तरं शोधू लागले आहेत. सोप्या उत्तरांनी जटिल प्रश्न सुटतील असं त्यांना वाटू लागलं आहे. पण अस्वस्थ भवतालात, गरगरत्या उधाणात अशा सोप्या उत्तरांनी योग्य, शाश्वत दिशा सापडत नाही.
भारत हा केवढा मोठा खंडप्राय देश. तितकाच गुंतागुंतीचाही. प्रत्येकवेळी आपल्याला वाटतं की, आता आपल्याला भारत समजला आणि त्याक्षणी हा देश आपला एक अत्यंत वेगळा, नवीन चेहरा आपल्याला दाखवतो. मला भारत पूर्ण समजला, असा दावा करील तो माणूस मूर्ख असेल, हे निश्चित! गेल्या शतकाच्या मधल्या काळात बहुसंख्य पाश्चिमात्य शैक्षणिक आणि बुद्धिवादी संस्थांनी असं भाकीत केलं होतं की, भारत नावाच्या देशाचा हा डोलारा कोसळणार. २९ राज्यं आहेत. जगातल्या प्रत्येक धर्माची माणसं इथं राहतात. देशात १७ अधिकृत भाषा आहेत आणि शेकडो पोटभाषा आहेत. हिमालयाच्या रांगांपासून पश्चिमेला वाळवंटापर्यंत भौगोलिक वैविध्यही विपुल आहे. इतकं वैविध्य असलेला हा देश उभा राहील, देश म्हणून आकार घेईल असं बहुतांश तज्ज्ञांना वाटलं नव्हतं. टोकाचे विरोधाभास आणि वैविध्य यामुळेच या देशाचे अनेक तुकडे होतील असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते. पण तसं झालं नाही. इंदिरा गांधींना एकदा कुणीतरी विचारलं होतं की, भारत उजवीकडे झुकेल की डावीकडे? त्या म्हणाला होत्या, ना उजवीकडे ना डावीकडे, भारत भक्कम पायावर ताठ, सरळ उभा राहील आणि उंच उठून दिसेल!
स्वातंत्र्यानंतर आजवर भारताने केलेल्या प्रवासाची वाट अत्यंत अवघड आणि प्रचंड खाचखळग्यांची होती. फाळणी हे तर जगातलं आजवरच मोठं रक्तरंजित स्थलांतर होतं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात ४० कोटी लोक रोज उपाशी राहत होते. तिथून प्रवास सुरू झाला आणि आज भारतानं कमावलेलं स्थान लक्षणीय आहे. साक्षरता वाढते आहे, आरोग्य सुविधांचा विस्तार होतो आहे, सरासरी आयुष्यमान उंचावलं आहे. भारत धनधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, तुटवडा सरला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर देशानं आघाडी घेतली आहे. एकेकाळी राजीव गांधी आणि माझे सन्मित्र सॅम पित्रोदा यांनी भारतात संगणक आणले तेव्हा त्यावर भयंकर टीका झाली. त्यांना निर्भत्सना सहन करावी लागली.
भारताने आयआयटीसारख्या संस्थांची पायाभरणी केली तेव्हाही जगभरातून टीका झाली. भारतासारख्या गरीब देशात तंत्रज्ञानाचं उच्चशिक्षण देणाºया शैक्षणिक संस्थांची, त्यासाठी निधीच्या उधळपट्टीची गरजच काय, असे प्रश्न उभे केले गेले. आज आयआयटी आणि अन्य उच्च शिक्षण देणाºया संस्था अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. याच संस्थांतून शिकलेले भारतीय तरुण तंत्रज्ञानाच्या जागतिक प्रक्रियेच्या नेतृत्वस्थानी आहेत. काही लाख लोक याचकाळात गरिबीच्या खाईतून बाहेर पडले. जगाच्या इतिहासात नोंद आहे की, भारताशिवाय दुसºया कुठल्याही लोकशाही राष्टÑाला हे इतक्या कमी काळात करून दाखवणं जमलेलं नाही. आणि हे सारं करताना भारताने हिंसेचा हात धरलेला नाही, लोकांचे खून पाडत हे स्थित्यंतर घडवलं नाही. हे घडलं एकत्रित, शांततापूर्ण वाटचालीतून, सहअस्तित्वातून! येत्या २०३० सालापर्यंत जर भारत अजून ३५ कोटी माणसांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढू शकला तर मानवी वंशाच्या इतिहासात ती एक मोठी अभिमानास्पद गोष्ट ठरेल. पण हे साध्य करायचं तर येत्या १३ वर्षांत भारताला विकासदर किमान ८ टक्के तरी राखावा लागेल.
आर्थिक विकास दर आणि रोजगार निर्मिती यांचं हे धडाडतं इंजिन भारताने १९४७ पासून अखंड धावत ठेवलं आहे. रोजगार निर्मिती न करता होणारा विकास भारतासाठी पुरेसा नाही. देशात रोजगार निर्मिती होत नसेल तर देशांतर्गत प्रश्नच सुटू शकत नाहीत. रोजगार निर्मिती हे भारतासमोरचं मध्यवर्ती आव्हान आहे. साधारण १ कोटी १२ लाख तरुण दरवर्षी जॉब मार्केटमध्ये दाखल होतात. त्यापैकी ९० टक्के तरुणांनी किमान उच्च माध्यमिक किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेलं असत. भारत हा लोकशाही देश आहे, त्यामुळे इथं चीनचं ‘मॉडेल’ निरुपयोगी ठरेल. भारतात रोजगार निर्मितीही लोकशाही वातावरणातच होणं गरजेचं आहे. चीनचं फॅक्टºया चालवण्याचं धाकदपटशाचं वातावरण भारतात नाही, आणि असूही नये. भारतात रोजगार निर्मितीमुख्यत्वे लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांतच करावी लागेल. पुढे जाऊन याच लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचं आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रूपांतर करावं लागेल. भारतातल्या आर्थिक अनिश्चिततेचा सामना मोठे उद्योग सहज करू शकतात, त्यांचे जागतिक कॉण्टॅक्ट, त्यांचे सुरक्षित आधार त्यांना संरक्षण पुरवतात. पण भारताची खरी ताकद मात्र लाखो लहान-मोठे उद्योग आणि त्यांना चालवणाºया कल्पक तरुण उद्योजकांतच आहे. त्यांना पाठिंबा, प्रोत्साहन आणि सहकार्याची आवश्यकता आहे.
भारतानं मोठी गती घेतली आहे आणि आता हे स्थित्यंतर अशा एका टप्प्यात येऊन पोहचलं आहे की त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे, कारण आता मागे हटणं, थांबणं, अपयश येणं हा पर्यायच उरलेला नाही. या वाटचालीत देश म्हणून भारताला अपयश आलं तर?- तर सारं जग हादरून जाईल. देशातील १३० कोटी लोकसंख्येला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणं हे मोठं आव्हान आहे. माणसांच्या रोजच्या जगण्यात उलथापालथ न करता, स्वाभाविक प्रक्रियेने हे नातं जोडावं लागेल. तसं झालं नाही, तर मात्र भयानक हिंसाचार उफाळून येऊ शकतो.
आजवरचा प्रवास भारतानं शांततेनं, परस्पर सौहार्दानं केला. पण या गतीची एक नकारात्मक अधोगतीही आहेच. परस्पर विखार, हिंसा, धु्रवीकरणाचं राजकारण यांनी आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. विखार आणि खुमखुमी लोकांचं लक्ष भरकटवत आहे. उदारमतवादी पत्रकारांना गोळ्या घातल्या जात आहे, गोमांस खाल्लं म्हणून मुस्लीम आणि दलितांना भररस्त्यात ठेचून मारलं जातं आहे. हा नवा भारत, खºया भारताला फार मोठी क्षती पोहचवतो आहे. आजच्या जगात हा विखार अत्यंत भयानक आहे. हा विखार माणसांना एकटं गाठतो आणि त्यांच्यात जहरी विचार रुजवू लागतो. आणि हे घातक आहे.
भारत असा नाही. खरा भारत समजून घेतला, त्याचं ऐकलं तर आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरं भारतातच सापडतील. भारत नावाची गेल्या ७० वर्षात बांधली गेलेली व्यवस्था तुम्हाला या देशाचं संपूर्ण भान देते. भारतात सर्व विषयातले तज्ज्ञ आहेत. भारताचं स्वत:चं असं एक संस्थात्मक ज्ञान आहे, ते समजून न घेता घाईघाईत निर्णय करणं ही नुस्ती बेपर्वाईच नाही तर ते देशासाठी अत्यंत घातक आहे. या बेपर्वाईला आवर घातला गेला नाही तर आजवर भारतानं जो पल्ला गाठला, जी घडी बसवली तीच विस्कटून जायची भीती निर्माण झाली आहे.
आणि तसं झालं तर ही फक्त भारतावरच नाही तर सा-या जगावरच ओढवलेली एक मोठी आपत्ती असेल!


कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. वर्तमान राजकीय धुमाळीत राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या व्यक्तिगत विचारांची, दृष्टीकोनाची ओळख दुर्मीळ होऊन बसली आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका दौºयात केलेली विविध भाषणे आणि संवाद यांची देशात वरीच चर्चा झाली, तीही त्यातल्या वर्तमान राजकीय संदर्भांच्याभोवती आणि राहुल गांधींच्या प्रतिमासंवर्धनाच्या पाशर््वभूमीवर! अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात त्यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अनुवाद या तरुण नेत्याच्या विचारविश्वाची ओळख देणारा आहे.

‘आयडियाज हॅव पीपल!’
पाश्चिमात्य जगात एक सर्वसामान्य संकल्पना आहे, ती म्हणजे, पीपल हॅव आयडियाज!- माणसांकडे कल्पना असतात. पण जगाकडे पाहण्याचा आणखी एक सर्वस्वी वेगळा दृष्टिकोन असू शकतो तो म्हणजे ‘आयडियाज हॅव पीपल!’- माणसं आतून, उत्स्फूर्तपणे काही कल्पना स्वीकारतात. माझ्याकडे अमुक कल्पना आहे असं म्हणण्यापेक्षा अमुक कल्पना माझी आहे, मी त्या कल्पनेच्या पाठीशी उभा राहीन असं म्हणतात आणि तशा वर्तनाचं ध्येय स्वीकारतात. गांधीजींनी दिलेलं अहिंसेचं सूत्र ही अशीच लोकांनी स्वीकारलेली कल्पना होती.
कलूषित, कडवट कल्पनांनी पछाडलेल्या माणसाला प्रतिसाद म्हणून फक्त प्रेम आणि अनुकंपाच देता येते. त्याच्यासंदर्भात काहीही कृती किंवा प्रतिक्रिया द्यायची तर आपण फक्त त्या वाईट, कडवट कल्पनेतून त्याची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करू शकतो आणि त्याजागी एक चांगली, सकारात्मक कल्पनाच रुजवू शकतो. अशा माणसाला वठणीवर आणायचं म्हणून जर आपण हिंसेचा मार्ग अवलंबला तर त्याचा उलटाच परिणाम होतो, त्याची कडवट कल्पना त्याच्या पाठीराख्यांमध्ये, त्याच्यावर प्रेम करणा-या माणसांमध्ये अधिकच जोरकसपणे पसरते. त्यामुळे हिंसेला उत्तर हिंसा असू शकत नाही. अहिंसेचं हे तत्वज्ञान भारताबाहेर जगभर पसरलं ते याचमुळे. सिझर शावेज म्हणतो तसं अहिंसा ही काही एक कृती नव्हे, तो चर्चेचा विषयही नव्हे, दुबळ्या आणि भित्र्या माणसाचं ते काम नव्हे. अहिंसा म्हणजे

अतोनात, अपार मेहनत!
मात्र आज भारतात अहिंसेचं हे मूलभूत तत्त्वज्ञानच संकटात आहे! त्याच्यावरच हल्ले होत आहेत. भारताला बांधून ठेवणारं हे सूत्रच आज घायाळ होतं आहे; मात्र तरीही एक गोष्ट निर्विवाद सत्य, या २१ व्या शतकातही मानवजातीला जोडून आणि जगवून ठेवेल अशी ही एकमेव गोष्ट आहे. आणि या अस्वस्थ, अवघड काळातून ती अधिक शक्तिशाली होत झळाळून बाहेर पडेल!

Web Title: India: Erect and tall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.