ट्रेन १८!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:03 AM2018-12-16T06:03:00+5:302018-12-16T06:05:06+5:30

बुलेट ट्रेनच्या आधी येत्या काही दिवसांत येतेय ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावणारी ‘सेमी हाय स्पीड’ रेल्वे..

Features of India's fastest Train 18! | ट्रेन १८!

ट्रेन १८!

Next
ठळक मुद्दे ‘मेक इन इंडिया’ योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.

भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा नोंदवला गेलेला सर्वाधिक वेग होता ताशी १६० किलोमीटर; पण रेल्वेनं आता ‘ट्रेन १८’ ही नवी रेल्वे रुळांवर उतरवण्याचा निर्णय घेतला असून, पारंपरिक रेल्वेपेक्षा ती सर्वार्थानं वेगळी असणार आहे.
बुलेट ट्रेनच्या आधी ही ‘सेमी हाय स्पीड’ रेल्वे रुळांवर उतरेल. या रेल्वेची चाचणीही घेण्यात आली असून, येत्या काही दिवसांत प्रवाशांना घेऊन ती धावताना दिसेल. ही रेल्वे आतापर्यंतची सर्वात वेगवान रेल्वे तर असेलच; पण तिच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमुळेही सध्या ती चर्चेत आहे.
काय आहे ‘ट्रेन १८’चं वैशिष्ट्य?..
- ‘मेक इन इंडिया’ योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.
- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.
- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.
- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.
- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.
- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.
- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील.
- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि ‘अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स’ असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.
- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.
- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.
- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.
- पहिल्या ‘ट्रेन १८’मध्ये १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ तर दोन डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.
- ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.
- ही रेल्वे येत्या काळात ‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा घेईल.
- सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील.
- ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.
- ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावेल, हे अजून निश्चित नसले तरी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावण्याची ती शक्यता आहे.
- सर्व काही नियोजनाप्रमाणे झालं तर २५ डिसेंबर २०१८पासून ही रेल्वे रुळांवर धावू शकेल. २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. भारतीय रेल्वेचीही वाजपेयी यांना ती आदरांजली ठरेल.
- मंथन प्रतिनिधी

Web Title: Features of India's fastest Train 18!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.