प्रा. अनंत येवलेकर
 
मराठीतील निवडक दर्जेदार ब्लॉगमधला हा एक. अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी 2क्क्6 पासून हा ब्लॉग लिहित आहेत. विशेष म्हणजे, कुलकर्णी द्वैभाषिक ब्लॉग लिहितात. (‘लुकिंग अॅट कार्टून्स गेटिंग अलॉँग’ - इंग्रजीतून) हे लेखन चोखंदळ वाचकाला मेजवानी देते. व्यंगचित्रे हा लेखकाने धरलेला भोज्जा. मराठी साहित्याचे अधिक उणो पक्के ठाऊक. मोकळा विचार आणि अभिव्यक्ती यामुळे त्याची उंची राखली गेलीय. अगदी मोजक्या शब्दात कमाल आशय प्रकट करण्याची विलक्षण हातोटी अनिरुद्ध यांच्याकडे आहे. अर्थ नेमका गेला पाहिजे यासाठी ते अचूक अवतरणो उद्धृत करतात. निके सत्त्व उचलून पुढय़ात ठेवणारे थोडेच असतात. अनिरुद्ध कुलकर्णी त्यातले आहेत. अर्थात वाचणाराची थोडी पूर्वतयारीही हवी.
 
  http://searchingforlaugh.blogspot.in/