दिपोत्सवाचं चैतन्यपर्व, लक्ष लक्ष दिव्यांनी दीपावली आपल्या अंगणात येते आणि चैतन्याची रुजवात करते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 05:00 AM2017-10-15T05:00:00+5:302017-10-15T05:00:00+5:30

लक्ष लक्ष दिव्यांनी दीपावली आपल्या अंगणात येते आणि चैतन्याची रुजवात करते.

Deepavva's Chaitanyaapravya, Diwali comes in its courtyard with light attention and starts chaitanya | दिपोत्सवाचं चैतन्यपर्व, लक्ष लक्ष दिव्यांनी दीपावली आपल्या अंगणात येते आणि चैतन्याची रुजवात करते

दिपोत्सवाचं चैतन्यपर्व, लक्ष लक्ष दिव्यांनी दीपावली आपल्या अंगणात येते आणि चैतन्याची रुजवात करते

Next

- डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

लक्ष लक्ष दिव्यांनी दीपावली
आपल्या अंगणात येते आणि
चैतन्याची रुजवात करते.
दिवाळीची रूपं तरी किती!
दिवाळी म्हणजे चैतन्याची आरास,
दिवाळी म्हणजे सांस्कृतिक मेजवानी आणि
आपुलकीच्या नात्यांची जपवणूक!
अंधारातून प्रकाशाकडे आणि
अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा
एक आनंददायी तेजोमय मार्ग..
दीपावलीच्या सहस्र शुभेच्छा..!

नवरात्रीच्या नऊ दिवसात आदिशक्तीकडून संक्रमित झालेली ऊर्जा घेऊन थाटामाटात दसरा साजरा होतो आणि लगेचच चाहूल लागते ती दिवाळीची! दसरा ते दिवाळी या दिवसांतलं वातावरण विलक्षण चैतन्यमय असतं! दिवाळी प्रत्यक्षात चारच दिवस साजरी केली जाते; पण दिवाळीची तयारी मात्र खूप आधीपासून सुरू होते. सर्व स्थिरचराला गती देणारी ही दिवाळीची तयारी सगळा भवताल चैतन्याने आणि प्रसन्नतेने भारून टाकते.

दिवाळी म्हणजे आकाशकंदील... दिवाळी म्हणजे फटाके... दिवाळी म्हणजे किल्ला... दिवाळी म्हणजे नवे कपडे... दिवाळी म्हणजे खाऊच खाऊ... लहान मुलांना दिवाळीचं आकर्षण असतं ते या सगळ्यामुळे. त्याबरोबरच दिवाळी म्हणजे सहामाही परीक्षेनंतरची सुटी आणि दिवाळी म्हणजे सुटीतला अभ्यास! शाळा-अभ्यास-क्लासच्या कचाट्यातून थोडी विश्रांती म्हणजे दिवाळी! दिवाळीची चाहूल लावणारे हे दिवस मुलांसाठी फार महत्त्वाचे असतात! दिवाळी म्हणजे फराळ! दिवाळी म्हणजे लाडू, चकली, अनरसे, चिवडा आणि कडबोळी! परंपरेनुसार दिवाळीत खाल्ले जाणारे हे पदार्थ कधी घरात बनतात, तर आजकाल कधी कधी तयार होऊनच घरी येतात; पण दिवाळीसाठी होणाºया सामानाच्या याद्या... दारादारांत उन्हात वाळत घातलेले चिवड्याचे पोहे, भाजण्या भाजल्याचे वास आणि ठरावीक पीठ ठरावीक जाडीचंच हवं हा आग्रह धरून गिरणीवाल्याशी केलेली चर्चा, नव्या-जुन्या माध्यमातून इकडून-तिकडे जाणाºया पदार्थांच्या पाककृती आणि फराळाचे पदार्थ उत्तम होण्यासाठी, चकली खुसखुशीत होण्यासाठी, चिवडा टेस्टी आणि कुरकुरीत होण्यासाठी, लाडू मऊसर होण्यासाठी करावयाच्या युक्त्या या यच्चयावत स्त्रियांच्या गप्पांमध्ये मानाचं स्थान मिळवतात. या चर्चा आणि या विषयीची फोनवरची संभाषणं दैनंदिन जीवनात नवचैतन्य आणतात!

दिवाळी म्हणजे खरेदी! आणि दिवाळी म्हणजे विक्रीही! कुठल्याही बाजारपेठेत जा सगळीकडे खरेदीला प्रवृत्त करणाºया धमाकेदार आॅफर्स आणि आकर्षक योजनांची खैरात ग्राहकाला खिसा उघडायला भाग पाडत असते. दागदागिन्यांपासून कपडे, खेळणी, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वापराची उपकरणे, सगळीच दुकानं ग्राहकांनी खचाखच भरलेली असतात. कितीतरी मोठ्या प्रमाणात उलाढाल या काळात बाजारपेठेत होत असते. पैसा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलत असल्याने आर्थिक सुबत्ता जाणवत असते. आॅनलाइन शॉपिंगचा नवा पर्याय उपलब्ध झाल्याने घरोघरी कुरिअर येत असतात आणि रस्तोरस्ती पार्सल पोहोचवणारी लोकं वावरताना दिसतात. अनेक ठिकाणी छोटी-मोठी प्रदर्शनं भरत असतात आणि त्यांना उत्तम प्रतिसादही मिळत असतो. मोठ्या व्यावसायिकांबरोबर छोटे व्यावसायिकही खूश असतात. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर होते कारण दिवाळी म्हणजे - बोनस! सर्व स्तरांवरचे नोकरदार, कामगार खूश आणि व्यावसायिकही! दिवाळी म्हणजे स्वच्छता! दिवाळीच्या स्वागताला सिद्ध होताना या दिवसात घराघरात स्वच्छता मोहीम राबवली जाते. नकोशा, जुन्या वस्तू घराबाहेर पडून घर स्वच्छ होतं आणि चांगला धंदा झाल्याने रस्तोरस्ती फिरणारा भंगारवालाही धंदा करून घेतो!

दिवाळी म्हणजे रांगोळी! दिवाळी म्हणजे दिवे! दिवाळी म्हणजे सजावट! दिवे-रांगोळी-सजावटीचे असंख्य नवनवीन प्रकार याच काळात बाजारपेठेत येतात आणि त्याची तडाखेबंद विक्रीही होते.

दिवाळी म्हणजे रंगरंगोटी! दिवाळी म्हणजे नूतनीकरण! रंगांची, नूतनीकरणाची, फर्निचरची कामं घरात, दुकानात, आॅफिसात काढली जातात. आणि या दिवसात मोठ्या जोरात पूर्णत्वाला जातात. दिवाळी म्हणजे सांस्कृतिक मेजवानी! दिवाळी म्हणजे दिवाळी अंक आणि दिवाळी म्हणजे दिवाळी पहाट! सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाºया दिवाळीच्या दिवसांचे वेध याच दिवसात लागतात. कुणी कार्यक्रमाची आखणी करण्यात व्यग्र, तर कुणी तयारी करण्यात. दिवाळी अंकांचं प्रकाशन याच दिवसात होतं. सुस्तावलेल्या सणाच्या

दुपारी काय वाचायचं याचा विचार अनेकजण आधीच करून ठेवतात.
दिवाळी म्हणजे नात्यांची जपवणूक! भावा-बहिणीच्या नवरा-बायकोच्या, कुटुंबातल्या आणि सग्यासोयºयांमधली नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी होणारी भेटवस्तूंची खरेदी याच दिवसात होते.

संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात साजºया होणाºया या दिव्याच्या उत्सवाची तयारी परदेशातही अशीच उत्साहाने होते. फराळाचे तयार पदार्थ, उटणे, कच्ची सामग्री परदेशस्थ भारतीयांसाठी या दिवसातच निघते कुरिअरने!
शरद ऋतुतल्या निरभ्र आकाश असणाºया थंड रात्री आणि दुपारी उन्हाचा तडाखा असं वातावरण आलं, की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. हा वातावरणातला बदल जाणवतो तो याच दिवसात. बाकी काहीही असो, दिवाळी म्हणजे सुटी. दिवाळी म्हणजे मज्जा, भेटीगाठी, गोडाधोडाचे जेवण आणि ताणाचा निचरा! आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी प्रत्येकासाठी काहीतरी घेऊन येणारी दिवाळी- वातावरण, चैतन्यमय करते आहे. चला, आपणही या प्रसन्न वातावरणात सामील व्हायला तयार होऊयात. थोडं हलकं होऊयात. मोकळं होऊयात!..

Web Title: Deepavva's Chaitanyaapravya, Diwali comes in its courtyard with light attention and starts chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी