दाऊदचं 'डिप्रेशन'...दाऊद सध्या नैराश्याने ग्रासला आहे

By ऑनलाइन लोकमत on Sun, December 03, 2017 5:00am

सुमारे चाळीस वर्षे झाली, तरी दहशत कायम असलेला दाऊद इब्राहिम सध्या नैराश्याने ग्रासला आहे. कारण? त्याच्या एकुलत्या एका मुलाने बापाच्या प्रचंड साम्राज्याकडे पाठ फिरवून विरक्ती स्वीकारली आहे. मोईन नवाज दाऊद कासकर सध्या मौलवी झाला असून, त्याने बापाशी संबंध तोडले आहेत. आधीच निद्रानाशाने ग्रासलेला दाऊद आता नैराश्याने खंगू लागला आहे. नियतीने असा विचित्र सूड उगवलेल्या दाऊदच्या उत्कर्षाची, ...आणि अवनतीची विलक्षण कहाणी!

रवींद्र राऊळ

दाऊद इब्राहिमच्या भारतासह डझनाहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या अवाढव्य गुन्हेगारी साम्राज्याचा वारस कोण, या प्रश्नाने सध्या मुंबईच्याच नव्हे तर देशभरातील अंडरवर्ल्डमध्ये उलथापालथ केली आहे. दाऊद इब्राहिमबाबत कोणती ना कोणती बातमी येत नाही, असा दिवस नव्वदच्या दशकापासून आजवर उजाडलेला नाही.. कधी त्याला दुबईतून फरफटत मुंबईत आणू, असा गृहमंत्र्याचा इशारा, कधी त्याच्या मुलीचं लग्न, कधी त्याच्या मालमत्तेचा लिलाव, कधी दाऊदला भारतात आणण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची सेटलमेंट सुरू असल्याचा राज ठाकरेंचा आरोप, कधी त्याला कोणत्या राजकारण्याने फोन केले, याच्या चर्चा तर कधी मुंबईत दाऊदला पुन्हा स्फोट घडवायचेत... यासंदर्भाच्या काही ना काही बातम्या प्रसारमाध्यमातून नेहमीच येत असतात; मात्र अगदी अलीकडेच आलेल्या एका बातमीनं साºयांचंच लक्ष वेधून घेतलंय. ‘दाऊदचा एकतीस वर्षीय मुलगा मोईन नवाज दाऊद कासकर आपल्या बापाच्या गुन्हेगारी कारवायांबाबत नाराज असून, तो मौलवी झाला आहे. इतकंच नाही तर कराचीतील क्लिफ्टन परिसरातील बंगल्याला रामराम ठोकून मशीद चालकांनी दिलेल्या घरात त्याने आपली पत्नी आणि तीन मुलांसह वेगळी चूल मांडलीय. धर्मग्रंथ कुराणाचं पठण करणं आणि तरुण मुलांना धार्मिक आचरणांचे धडे देणं हाच त्याचा सध्याचा दिनक्रम आहे. मुलाच्या अशा वागण्याने देशोदेशी पसरलेल्या आपल्या गुन्हेगारी साम्राज्याचा प्रचंड मोठा व्याप यापुढे कोण सांभाळणार, या विवंचनेत असलेल्या दाऊदला नैराश्यानं ग्रासलंय’, हे वृत्त मुंबईच्या अंडरवर्ल्डसाठी सध्या कमालीचं कुतुहलाचं आणि औत्सुक्य निर्माण करणारं ठरलंय. खुद्द दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यानेच ही हकीगत पोलिसांना सांगितली आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाचे पैसे घेऊन पलायन करणाºया दाऊदने गेल्या चाळीस वर्षांत आपल्या टोळीची उलाढाल अब्जवधींच्या घरात नेत अमाप संपत्ती गोळा केली. दोन वर्षांपूर्वी दाऊदची ज्ञात मालमत्ता ६.७ दशकोटी अमेरिकन डॉलर्स इतकी होती, असं सांगण्यात येतं. केवळ कोलंबियाचा ड्रग्ज स्मगलर पाब्लो इस्कोबार हा त्याच्या पुढे होता. १९८९ साली पाब्लोची मालमत्ता होती ९ दशकोटी अमेरिकन डॉलर्स. पण माहितगारांच्या अंदाजानुसार नंतरच्या काळात दाऊदनं पाब्लोलाही मागे टाकलं असावं. चाळीस वर्षांच्या गुन्हेगारी कारकिर्दीत काळ्या कमाईचं इतकं मोठं साम्राज्य उभारणाºया दाऊदच्या मुलाने विरक्ती येऊन या साम्राज्याकडे पाठ फिरवावी, हा नियतीनेच त्याच्यावर उगवलेला सूड म्हणावं लागेल.

(लेखक संज्ञापन आणि माध्यमतज्ञ आहेत.)  

संबंधित

1993 मुंबई बॉम्बस्फोट : आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला मुंबईत आणलं
दाऊदचा फोन येतो, पण तो कुठेय कळत नाही; इक्बाल कासकरची ठाणे कोर्टात माहिती
सोहराबुद्दीन शेखचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी होता थेट संबंध, जेठमलानींचा गंभीर आरोप 
दाऊद इब्राहिमनं पुतण्याद्वारे जेलमध्ये इकबाल कासकरसाठी पाठवला मेसेज - सूत्र
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या तिहार कारागृहातील हत्येचा कट फसला, दाऊदने रचलं होतं षड़यंत्र

मंथन कडून आणखी

तनुश्री दत्ता वाद आणि सिनेमाचा कॉंन्ट्रॅक्ट
सिनेमा क्षेत्रात एक अभिनेत्री जेव्हा नकोशा स्पर्शाबद्दल आवाज उठवते तेव्हा..
रंगमंच - नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग !
जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!
वनमंथन

आणखी वाचा