योगेशची जिद्द व चिकाटी; पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड, मालेगावातील दुग्धजन्य पदार्थांना आंध्रप्रदेशात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:42 AM2018-01-08T08:42:58+5:302018-01-08T08:44:39+5:30

मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो काणतेही असंभव कामाला स्वरुप देवून ते संभव करु शकते. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करुन दाखविला.

Yogesh's courage and perseverance; Modern-day conventional business, demand for Malegaon milk products in Andhra Pradesh | योगेशची जिद्द व चिकाटी; पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड, मालेगावातील दुग्धजन्य पदार्थांना आंध्रप्रदेशात मागणी

योगेशची जिद्द व चिकाटी; पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड, मालेगावातील दुग्धजन्य पदार्थांना आंध्रप्रदेशात मागणी

Next

वाशिम- मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो काणतेही असंभव कामाला स्वरुप देवून ते संभव करु शकते. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करुन दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्रप्रदेशातून चांगलीच मागणी आहे. दिवसाकाठी मालेगाव या छोटयाश्या गावात ७० ते ७५ हजार रुपये प्रतिदिन दुग्धजन्य पदाथार्ची विक्री करण्याची किमया योगेश रामचंद्र बळी यांनी करुन दाखविली आहे. विशेष म्हणजे या पारंपारिक व्यवसायाला चालविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरीसुध्दा सोडून दिली हे विशेष!

वाशिम जिल्हयातील सर्वात छोटा तालुका म्हणून मालेगाव तालुक्याची ओळख आहे. या छोटयाश्या गावात योगेशने केलेल्या या किमयाची सर्वत्र कौतूक होत आहे. योगेशचे वडिलांची दूध डेअरी होती. कोणतीही मिलावट न करता दुधाची विक्री करणारे म्हणून ते शहरात प्रसिध्द होते. त्यामुळे त्यांच्या डेअरीचे नाव सुध्दा संपूर्ण तालुक्यात प्रसिध्द होते. खेडयापाडयातील नागरिक सुध्दा दुध, तुपाची चणचण भासली की, बळींच्या डेअरीवरुन घेवून या असे म्हणायचे. त्यांचा मुलगा शिकून मेहकर येथे शिक्षक म्हणून कार्य करु लागला. ७ वर्षांपर्यंत शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना आपल्या वडिलांनी सुरु केलेल्या व्यवसायाला पुढे नेण्याच्या दुष्टीने त्याने विचार केला. त्याने दुधासोबत आधी थोडया प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ बनवून ते गावातचं विकणे सुरु केले. दिवसेंदिवस मागणीत वाढ झाली. यांनी तयार केलेला माल नागपूर येथील एका व्यावसायिकाने नेला व तेव्हापासून नागपुरला सुध्दा यांचा माल जायला लागला. आजच्या घडीला दिवसेंदिवस प्रसिध्दी मिळत आंध्रप्रदेशातील हैद्राबादसह ईतर गावात यांच्या दुग्ध्धजन्य पदार्थ्यांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. दिवसभर कढईमध्ये दुध घोटण्यासहच विविध दुग्धजन्य पदाथार्चे काम येथे अविरत सुरु राहते. विशेष म्हणजे आधी छोटयाश्या असलेल्या येथील बळी यांच्या डेअरीमध्ये जवळपास १५ मनुष्य काम करतात. येथे तयार करण्यात येत असलेले पनीर संपूर्ण जिल्हयात प्रसिध्द असून आजुबाजुच्या जिल्६यातील कोणत्याही कार्यक्रमासाठी येथून नेल्या जाते. 

१९८६ पासून रामचंद्र बळी दुधाचा व्यवसाय 
मालेगाव येथे १९८६ पासून रामचंद्र बळी दुधाचा व्यवसाय करायचे. २००० पर्यंत त्यांनी व्यवसाय चालविला. परंतु मेहकर येथे शिक्षक असलेल्या योगेश नामक मुलाने या व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरुप देत दुग्धजन्य पदार्थ बनविणे सुरु केले. ज्याप्रमाणे वडिलांचे नाव दुधडेअरी व्यवसायात होते तोच विश्वास त्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रीतही मिळविल्याने आजच्या घडीला त्यांच्या व्यवसायास भरभराटी आली आहे.

वडिलांचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचा विचार
वडिलांनी सुरु केलेली दुध डेअरी व तेथे असलेली गर्दी पाहता मी त्यांना मदत करायचो. परंतु नोकरी लागल्याने माझे याकडे दुर्लक्ष झाले. काही वर्ष नोकरी केल्यानंतर विचारा आला की वडिलांचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी म्हणून मी दुधापासूनच विविध पदार्थ बनविणे सुरु केले. आधी पारंपारिक पध्दतीने बनवित असलेले दुग्धजन्य पदार्थ गुगलवर सर्च करुन आधूनिक मशिनरीजची माहिती जाणून घेतली. आज एक एक करता कामापुरत्या मशिन्स उपलब्ध करणे सुरु आहे. २००० सालापासून मी हातात घेतलेल्या व्यवसायाने आज प्रसिध्दीसह चांगल्या उत्पादनाचा शिक्कामोर्तब झाला आहे. माज्याकडील पेढा संपूर्ण विदर्भासह आंध्रप्रदेशमध्ये प्रसिध्द आहे.
-योगेश रामचंद्र बळी, मालेगाव

Web Title: Yogesh's courage and perseverance; Modern-day conventional business, demand for Malegaon milk products in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.