गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:53 PM2018-12-09T23:53:26+5:302018-12-09T23:54:29+5:30

मालेगाव : येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाइल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Investor's 40 lakh 25 thousand cheats | गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक

गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक

Next

मालेगाव : येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाइल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अंजुमन चौक पवार गल्ली न्यू वॉर्ड येथे लेडिज स्टोअर दुकानदार आदील सुलतान अकील अहमद (२१) यांनी पोलिसात फिर्याद दिली. जून २०१७ ते आजपावेतो ही घटना घडली. हिरा ग्रुप आॅफ कंपनीचे सीईओ नौहेरा शेख, संचालक मुबारकजान शेख, सहायक सीईओ मौली थॉमस, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अबुजर अन्सारी, दुसरा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सलमान अन्सारी दोन्ही रा. सलीम मुन्शीनगर यांनी नयापुरा येथील शाखेत गुंतवणूक करून हमखास परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणूक योजना सांगून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित केले.
फिर्यादी व त्याच्या घरातील लोकांकडून २६ लाख ५० हजार रुपये वेळोवेळी स्वीकारून गुंतवणूक करून घेऊन फिर्यादीस काही प्रमाणात परतावा देऊन पुन्हा अचानक परतावा थांबविला. तसेच फिर्यादीची मुद्दल रक्कम आणि प्रतिमाह परतावा न देता २६ लाख ५० हजारांची फसवणूक केली व फिर्यादी सोबत अन्य आठ गुंतवणूकदारांनी विश्वासाने सोपविलेली एकूण १३ लाख ७५ हजारांची रक्कम अशी एकूण ४० लाख २५ हजारांची गुंतवणूक रक्कम स्वीकारून ती स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरून अन्यायाने फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांचा विश्वासघात व फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर करीत आहेत.

Web Title: Investor's 40 lakh 25 thousand cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.