पुणे : पतंग उडविताना इमारतीवरुन पडून लहानग्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 03:29 PM2018-01-28T15:29:56+5:302018-01-28T15:30:17+5:30

अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवत असताना चौथ्या मजल्यावरुन पडून एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

young children died, fallen from the building while flying kite in Pune | पुणे : पतंग उडविताना इमारतीवरुन पडून लहानग्याचा मृत्यू

पुणे : पतंग उडविताना इमारतीवरुन पडून लहानग्याचा मृत्यू

googlenewsNext

पुणे : अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवत असताना चौथ्या मजल्यावरुन पडून एका ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. आतिक चांद शेख (वय 8, रा़ वसुंधरा सोसायटीच्या मागे, अश्रफनगर, कोंढवा) असे या मुलाचे नाव आहे. 

याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, व्हीआयटीआय कॉलेजच्या पाठीमागील गेटसमोर एक चार मजली अर्धवट बांधलेली इमारत आहे. गेल्या एक वर्षांपासून तिचे काम बंद आहे़ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आतिक शेख, अरबाज सय्यद, मेहराज यांच्यासह तीन ते चार मुले या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली. पतंग उडत असताना अचानक आतिक शेख हा इमारतीच्या कडेला गेले व त्याचा पाय घसरुन तो चौथ्या मजल्यावरुन खाली पडला, त्यात आतिकचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून मुलांनी नातेवाईकांना सांगितले. 

आतिक शेख हा कोंढव्यातील प्रतिभाताई पवार शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. त्याचे वडिल चांद शेख हे टेम्पोचालक आहेत.

Web Title: young children died, fallen from the building while flying kite in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.