International Yoga Day 2018 : योगा नृत्याची, नवीन संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:07 AM2018-06-21T02:07:48+5:302018-06-21T02:10:30+5:30

योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे.

 Yoga dance, new concept | International Yoga Day 2018 : योगा नृत्याची, नवीन संकल्पना

International Yoga Day 2018 : योगा नृत्याची, नवीन संकल्पना

Next

- अतुल चिंचली

पुणे : योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे. आजकालच्या आधुनिक युगात सर्व माणसे काम आणि पैसा कमवण्यात फारच व्यस्त आहेत. ते पैसे कमवण्यासाठी आता स्वत:च्या शरीराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. वयाच्या चाळिशी अथवा पन्नाशीनंतर सतत आजारांना सामोरे जावे लागते. या वयात अनेक लोक रिटायर होतात. मग त्यांना घरी बसून एकटेपणा जाणवू लागतो. या एकटेपणामुळे तणाव निर्माण होणे, शरीर निरोगी राहणे अशा गोष्टी घडण्यास सुरुवात होते. या गोष्टींना दूर करण्यासाठी फिटनेस फ्री या स्त्रियांच्या ग्रुपने योगा नृत्य ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली आहे.
फिटनेस फ्री ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली नाफडे असून, त्यांना मदत म्हणून शिकवण्याची सर्व जबाबदारी राधिका फडके घेतात. या ग्रुपमध्ये वीस स्त्री सदस्य असून, सर्व वयाने चाळीसपेक्षा पुढे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर फिटनेस फ्री या ग्रुपने हे पाऊल उचलले. जवळपास एक वर्षापासून हा ग्रुप निरनिराळ्या प्रकारचे योगा नृत्य करून दाखवत आहे. आपण योगासन करताना जे प्रकार उष्टसन, सूर्यनमस्कार, प्रार्थनासन, वीरासन, योगमुद्रासन, गोरक्षासन, स्वस्तिकासन, वज्रासन यातून योगा नृत्य दाखवले जाते. तसेच या नृत्यप्रकारात वेस्टर्न गाणी लावून त्यावर कथक अथवा गरबा नृत्य हा ग्रुप करतो. योगा नृत्यात एक नवीन प्रकार या ग्रुपने आणला आहे.
>योगा नृत्यामुळे होणारे फायदे
योगा नृत्याच्या संगीतामुळे मन आनंदी होऊन ते करण्याची उत्सुकता वाढते.
शरीर निरोगी राहते व एकटेपणा नाहीसा होतो.
सध्याच्या युगात होणारे मधुमेह, रक्तदाब या आजारांचा त्रास होत नाही.
मन प्रसन्न राहिल्याने तणाव निर्माण होत नाही व शरीर तंदुरुस्त राहते.
फिटनेस फ्री हा ग्रुप आता या योगा नृत्यमध्ये लहान मुले आणि तरुण मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेणार आहे. लहान मुले आणि तरुण योगासन करण्यास पुढाकार घेत नाहीत. त्यांना मोबाईलवाचून वेळ मिळत नाही व मैदानी खेळांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे कुठलाही आजार हा वयाच्या अठरा, वीस वर्षांपासून सुरू होते. हे वय आजाराचे नसून त्या वयात आजारांना सामोरे जावे लागणे हे त्यांच्यासाठी आणि भविष्यासाठी खूपच घातक आहे. त्यासाठी हा ग्रुप या योगा नृत्याची संकल्पना समाजासमोर मांडून लहान मुले तसेच तरुण वर्ग यात जास्तीत जास्त सहभागी होईल, असे प्रयत्न करणार आहे.
>पार्टनर योगा नृत्य
या नृत्यप्रकारात सी सो म्हणजेच उठाबशा काढणे हा व्यायाम केला जातो. पण या चाळिशी, पन्नाशीनंतर हे करणे अवघड होते. अशा वेळी या स्त्रिया एकमेकींच्या साहाय्याने हा नृत्यप्रकार करतात आणि तो करताना कुठलाही त्रास होत नाही.
>आपल्या जीवनात एक पोकळी निर्माण होणे गरजेचे आहे. काम करण्याबरोबर व्यायाम, योगासने करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. ती लक्षात घेतली तर सर्वांना निरोगी राहता येईल. आमचा फिटनेस फ्री ग्रुप यासाठी कार्यरत आहे. परंतु सर्वांनी त्यात सहभागी व्हावे आणि आजच्या योगा डे पासून व्यायाम करण्याची शपथ घ्यावी.
- वैशाली नाफडे,
अध्यक्षा, फिटनेस फ्री ग्रुप.

Web Title:  Yoga dance, new concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग