जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:02 AM2018-09-27T08:02:02+5:302018-09-27T08:02:02+5:30

महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

World Tourism Day Special: 10 famous tourist places of Maharashtra | जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

googlenewsNext

पुणे  : मराठी माणूस कंजूष आहे असं काहीवर्षांपूर्वी म्हटलं जायचं. आता मात्र हा विचार मागे पडत असून मराठी माणसे जगभर भ्रमंती करताना दिसून येतात. स्वतःसाठी कमवायचे आणि स्वतःसाठी खर्च करायचा अशी वृत्ती सध्या वाढत असल्याने अनेक जण पर्यटनाला प्राधान्य देतात. पण उपलब्ध वेळेनुसार परदेशात जाणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

 

 

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाचे ठाव घेणारे पहिले ठिकाण आहे. मुंबई, पुणे असो किंवा अगदी औरंगाबाद,नगर प्रत्येकाला महाबळेश्वर खुणावत असते. नवविवाहित जोडप्यांपासून ते अगदी कौटुंबिक पर्यटनासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. स्ट्रॉबेरी हे इथले फळही प्रसिद्ध आहे. 

 

वेरूळ-अजिंठा लेणी : औरंगाबादजवळ वसलेली ही लेणी बघण्यासाठी संपूर्ण जगभरातून लोक येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने ही लेणी एकदा तरी बघायलाच हवा. 

 

ताडोबा अभयारण्य : १९५५ साली तयार करण्यात आलेले हे महाराष्ट्रातले सर्वात जुने अभयारण्य आहे. मगर, सुसर, रानगवा यांच्यासोबत इथे वाघही मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यातील या अभयारण्यातील जीपवरील सफारी एकदा तरी अनुभवायलाच हवी. 

 

कोकण : कोकण प्रत्येक ऋतूत वेगवेगळे असते असे म्हटले जाते. माडांची झाडे, समुद्र, भरभरून देणारा निसर्ग, काजू, आंब्यांची लयलूट असा प्रत्येक ऋतूत कोकणात पर्यटन करण्याचा अनुभव भिन्न आहे. 

 

तारकर्ली बीच :फार  प्रवास करण्याची इच्छा नसेल तर तारकर्ली बीचला पर्याय नाही. शांतता, समुद्र आणि साहसी खेळ त्यामुळे तरुणाईच्या हृदयात तारकर्लीचे स्थान वरती आहे. 

 

मुंबई :मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी एकदा तरी प्रत्येकाला मुंबई बघण्याची इच्छा असतेच. विशेषतः मरिन ड्राइव्ह, वांद्रे- वरळी सी लिंक, हाजी-अली दर्गा, शिवाजीपार्क मैदान, फिल्मसिटी बघण्यासाठी मोठी गर्दी होत असते. 

 

पाचगणी : निसर्गाच्या वरदानाने भरून पावलेले ठिकाण अर्थात पाचगणी. महाबळेश्वरपासून अगदी जवळ असणाऱ्या पाचगणीचे नाव पाच डोंगरांच्या मधोमध वसल्याने पडले आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड अशी पाचगणीची  वैशिष्ट्ये आहेत. 

 

माथेरान : हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८०० मीटर उंचीवर वसलेल्या या ठिकाणाची  निर्मिती इंग्रजांनी केली आहे. शांत वातावरण, हवेतील थंडावा अनुभवायचा असेल तर माथेरानचा अनुभव घ्यायला हरकत नाही. 

 

कास पठार :सातारा शहरापासून पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा होतो.  पावसाळा सुरू झाल्यावर या पठारावर असंख्य प्रकारची  अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला  आहे.

 

चिखलदरा : विदर्भातले महाबळेश्वर म्हणून चिखलदरा ओळखले जाते.त्यामुळे  थंड हवेचे ठिकाण म्हणून हा पर्याय उत्तम आहे. 

Web Title: World Tourism Day Special: 10 famous tourist places of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.