कोयना, डेक्कन एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:30 AM2018-03-07T04:30:34+5:302018-03-07T04:30:34+5:30

आगामी महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

Women TC in Koyna, Deccan Express | कोयना, डेक्कन एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी

कोयना, डेक्कन एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी

Next

मुंबई  - आगामी महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी कोयना आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये केवळ महिला दिनी महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पार पडलेल्या या बैठकीत महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी मुंबईहून पुण्याला जाणाºया (११२०९) कोयना एक्स्प्रेस आणि पुण्याहून मुंबईकडे येणाºया (११००८) डेक्कन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी महिला तिकीट तपासनीसांची नियुक्ती करण्यात
येणार आहे. ८ मार्चपासून महिला टीसी एक्स्प्रेसमध्ये ्यआॅन ड्यूटी ्ण राहतील, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी सांगितले. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे०० हून जास्त महिला रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक चेंजिंग रूम उभारण्यात येतील. शिवाय सॅनिटरी नॅपकिन पॅड वेंडिंग मशीनही कार्यान्वित होणार आहे. महिला दिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजनदेखील मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे.

 

Web Title: Women TC in Koyna, Deccan Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.