कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या कॅल्शीयमच्या गोळ्य़ांत आढळली तार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:33 PM2017-10-03T20:33:56+5:302017-10-03T20:34:44+5:30

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे.

Wires detected in calcium pills given from Kalyan Dombivli Municipal Hospital | कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या कॅल्शीयमच्या गोळ्य़ांत आढळली तार

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या कॅल्शीयमच्या गोळ्य़ांत आढळली तार

Next

कल्याण - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ही बाब वेळीस निदर्शनास आल्याने मनसेच्या पुढाकाराने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध विभागाकडे याविषयीची तक्रार करण्यात आली आहे. 

    महापालिकेच्या रुग्णालयात योग्य प्रकारे उपचार मिळत नाही अशी बोंब नेहमीच उपचार घेण्यासाठी जाणा:या नागरीकांकडून केली जाते. काही औषधे ही बाजारात मिळत नाही. ती सरकरी रुग्णालयात मिळतात. कल्याण पूव्रेत राहणा:या रुपाली विशाल वाघचौरे या गरोदर आहे. त्या उपचारासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात गेल्या. त्यांना रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा दिल्या गेल्या. या गोळ्य़ा घरी आणून त्या घेणार तोच त्यांच्या निदर्शनास आले की, गोळ्य़ात तार आहे. त्यांना हे पाहून धक्काच बसला. त्यांचे पती हे मनसेचे शाखाध्यक्ष आहे. त्यांनी हा प्रकार मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांना सांगितला. हा प्रकार ऐकून त्यांनाही धक्काच बसला. देसाई यांनी वाघचौरे याना घेऊन रुग्णालय गाठले. त्याठिकाणी विचारणा केली असता रुग्णालयाने त्यांच्याकडून या गोळ्य़ा दिलेल्या गेलेल्या नाहीत असे सांगून हात वरती केले. पिवळ्य़ा रंगाच्या गोळ्य़ा रुग्णालयातून दिल्या नाहीत तर रुग्णालयात मिळणा:या गोळया बाहेर विकल्या जातात का असा संशय व्यक्त केला जात आहे.
रुग्णालयाकडून चूक मान्य केली गेली नसल्याने देसाई यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या  प्रकरणी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करता एका राजकीय पक्षाने तक्रार दिल्याने केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. देसाई यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हे उद्या कल्याणमध्ये येऊन वाघचौरे यांच्याकडे असलेल्या गोळ्य़ा तपासणीकराता नेणार आहे. त्यांच्या तपासणी अंती पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Web Title: Wires detected in calcium pills given from Kalyan Dombivli Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.