संशोधनासाठी पूरक वातावरण तयार करणार - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:22 AM2017-11-18T02:22:13+5:302017-11-18T02:23:59+5:30

नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

 Will create complementary atmosphere for research - Prakash Javadekar | संशोधनासाठी पूरक वातावरण तयार करणार - प्रकाश जावडेकर

संशोधनासाठी पूरक वातावरण तयार करणार - प्रकाश जावडेकर

Next

पुणे : नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन सोशल इनोव्हेशन’ या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर जावडेकर बोलत होते. यावेळी डेंग्यू आजाराचे कमी खर्चात आणि केवळ १५ मिनिटांत निदान करणाºया ‘डेंग्यू वन डे टेस्ट किट’ची निर्मिती करणाºया डॉ. नवीन खन्ना यांना जावडेकर यांच्या हस्ते ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, ‘इंटरनॅशनल लॉंन्जिव्हिटी सेंटर, इंडियाचे (आयएलसी इंडिया) अध्यक्ष जयंत उमराणीकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, अंजली राजे आदी या वेळी उपस्थित होते. परिषदेसाठी निवड झालेल्या आठ राज्यांमधील १८ संशोधकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
जावडेकर म्हणाले, ‘नावीन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून तीच संशोधनाची ताकद आहे. डॉ. खन्ना यांचे संशोधन हे ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण आहे.
ही संकल्पना केवळ भारतात उत्पादन करण्यापुरती मर्यादित नसून भारतातच संशोधन करून त्यात गुंतवणूक होऊन तयार उत्पादन अभिमानाने विक्रीस यावे, असे त्यात अभिप्रेत आहे.

Web Title:  Will create complementary atmosphere for research - Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.