हिंगोली : नव-यापासून विभक्त असलेल्या व माहेरी राहणा-या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून अश्लिल चित्र व मॅसेज टाकून बदनामी करणा-या पतीविरूद्ध पत्नीने पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 
कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोणवाडा येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. पती नांदवत नसल्यामुळे ती माहेरी राहत होती. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. त्यावर त्याने अश्लिल चित्र व घाणेरडे मॅसेज टाकून पत्नीची बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी महिला ही परभणी येथे शिक्षण घेत असलेल्या नर्सींग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा बदनामी केली. 
एवढ्यावरच न थांबता गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाईलवर देखील अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. या प्रकाराला त्रस्त होऊन शेवटी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी गणेश लिंगुराम मुंगावकर याच्याविरूद्ध सायबर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे करीत आहेत.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.