IPL Auction 2018ः आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत ?, ऋषी कपूर यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 04:11 PM2018-01-28T16:11:56+5:302018-01-28T18:57:24+5:30

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियातून समाजातील प्रश्नांवर अनेकदा भाष्य करतात, ट्विटवर त्यांनी केलेले ट्विट नेहमी चर्चेतही असतात.

Why not women cricketer in IPL auction, Rishi Kapoor? | IPL Auction 2018ः आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत ?, ऋषी कपूर यांचा सवाल 

IPL Auction 2018ः आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत ?, ऋषी कपूर यांचा सवाल 

Next

बंगळुरू- बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियातून समाजातील प्रश्नांवर अनेकदा भाष्य करतात, ट्विटवर त्यांनी केलेले ट्विट नेहमी चर्चेतही असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावाबाबत काही ट्विट्स केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आयपीएल लिलाव प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ट्विट करत ते म्हणाले, आयपीएल, एक विचार आहे! लिलावात महिला क्रिकेटपटूंना स्थान का नाही. आयपीएल लिलावात कोणताही भेदभाव करता कामा नये. आयपीएलच्या प्रत्येक संघात वेगवेगळ्या देशातील 11 खेळाडू आहेत किंवा ते लोक फार कठीण खेळ खेळतात, असं तुम्हाला वाटतं का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.



गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पद्मावतला विरोध करणा-या करणी सेनेच्या विषयावरही ट्विटरवरून टिप्पणी केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी रणवीर सिंहबरोबर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. आणि त्यात म्हटलं होतं की, करणी सेनेनं जर पद्मावतच्या प्रदर्शनाला विरोध केला तर रणवीर सिंह जोहर करेल, अशी घोषणा रणवीरनं केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानं ऋषी कपूर यांनी ते ट्विट काढून टाकलं होतं. परंतु त्या ट्विटचा स्क्रीनशॉट खूपच व्हायरल झाला होता.  

Web Title: Why not women cricketer in IPL auction, Rishi Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.