मुंबईत जी मजा आहे, ती दिल्लीत नाही- नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:59 AM2018-03-19T04:59:34+5:302018-03-19T04:59:34+5:30

मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा मला आजही फायदा होतो. त्यांचे नेतृत्व व भक्कम पाठबळामुळेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे करू शकलो. ‘जो बात मुंबई में है, वो दिल्ली में नहीं’ अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मनातील सुप्त भावना व्यक्त केली.

What's more interesting in Mumbai is not in Delhi - Nitin Gadkari | मुंबईत जी मजा आहे, ती दिल्लीत नाही- नितीन गडकरी

मुंबईत जी मजा आहे, ती दिल्लीत नाही- नितीन गडकरी

googlenewsNext

मुंबई : मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा मला आजही फायदा होतो. त्यांचे नेतृत्व व भक्कम पाठबळामुळेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे करू शकलो. ‘जो बात मुंबई में है, वो दिल्ली में नहीं’ अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मनातील सुप्त भावना व्यक्त
केली. लोकसभेचे माजी सभापती व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयोमान’ या पुस्तकाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी दादरच्या शिवाजी मंदिरात प्रकाशन झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
गडकरी म्हणाले, जोशी सर संयमी, तर मी आक्रमक होतो. त्यांच्या भक्कम पाठबळामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे करता आली. त्यामुळेच
मला दिल्लीपेक्षा मुंबईत काम करण्यात नेहमी आनंद मिळत राहिला.
>शरद पवार, उद्धव ठाकरेंची उपस्थिती
शरद पवार म्हणाले, सरांचे काम पाहिले तर ते काही लवकर निवृत्त होतील, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, मी ७५ वर्षांचा होईन, तेव्हा माझी मुलाखत नक्की घ्या. सध्या तरी मी माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा कित्ता गिरवत आहे. मी इतक्या लवकर निवृत्त होणार नाही. विचारांचे गाइड सध्या तरुणांकडे दिलेले आहे. ७५ वयोमानानंतर व्यक्तींच्या व्यथा, समस्या मांडण्याचे धाडस दाखविल्याबद्दल प्रतिभाताई पाटील यांनी मनोहर जोशी यांना धन्यवाद दिले.

Web Title: What's more interesting in Mumbai is not in Delhi - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.