कर्जतमध्ये रोहित पवारविरुद्ध सुजय विखे अशीच लढत !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 05:01 PM2019-07-10T17:01:18+5:302019-07-10T17:01:30+5:30

प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती.

Vidhan Sabha elections Rohit Pawar vs Sujay Vikhe in Karjat, | कर्जतमध्ये रोहित पवारविरुद्ध सुजय विखे अशीच लढत !

कर्जतमध्ये रोहित पवारविरुद्ध सुजय विखे अशीच लढत !

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. जेमतेम दोन महिन्यांच्या तयारीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु, पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार संपूर्ण तयारीनिशी कर्जतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या तयारीवर भाजपकडून डावपेच आखण्यात येत असून नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी देखील भाजपचे राम शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे पाटील अशीच रंगणार असं दिसतय.

कर्जत येथे आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती.

प्रा. राम शिंदे यांना कर्जत जामखेडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. अनेक विकासकामे केली. तरी देखील आपल्याला येथून आघाडी मिळाली नाही, हे एक कोडं असल्याचे विखे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी याचे कारणही सांगितले. राम शिंदे हे केलेल्या कामाची प्रसिद्ध करण्यात कमी पडले. त्यामुळेच कदाचित आपल्याला कर्जतमधून लीड मिळाली नसावी. मात्र आगामी काळात त्यांनी केलेली कामे गोरगरिबांपर्यंत पोहचतील, असही विखे यांनी म्हटले.

दरम्यान रोहित पवार कर्जतमधून इच्छूक असून मागील एक वर्षापासून त्यांनी काम सुरू केले आहे. त्याचीच परिणीती लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. एकूणच लोकसभेला कर्जतमधून भाजपची कमी झालेली लीड सुजय विखे यांना खटकणारीच आहे. त्यामुळे राम शिंदेसाठी विखे मन लावून काम करणार हे निश्चित आहे. यावरून ही लढत पवार विरुद्ध विखे अशीच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Vidhan Sabha elections Rohit Pawar vs Sujay Vikhe in Karjat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.