ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 12 - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र आले होते. यावेळी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांची मुलाखत घेऊन दोघांना बोलते केले. यावेळी ऋषी दर्डा यांनी दोघांना एक गंमतीशीर प्रश्न विचारला. सरकारमध्ये ज्या प्रमाणे विविध खाती असतात त्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत खाती द्यायची झाल्यास तुम्ही ती कोणाला द्याल. यावर दोघांनी दिलेले मजेशीर उत्तर ऐका. 

युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
 
आलियाला यावेळी आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने  गौरवण्यात आले. रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी ११ वर्षांचे होते. रणबीर संजय लीला भन्साळींना अस्टिस्ट करत होता. त्यावेळी काही वाटले नाही. पण ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले, असे आलिया म्हणाली. रणबीरची ‘बर्फी’मधली भूमिका बेस्ट होती, असेही तिने सांगितले.
 
या मुलाखतीत आलियाला मुंबई शहरात आणखी सुधारणा घडवण्यासाठी तू मुख्यमंत्र्यांना कुठला सल्ला देशील असा प्रश्न विचारला. त्यावर आलिया भट्टने मुंबई शहराबद्दल कोणतीही तक्रार नसून, मुंबई उत्तम शहर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत. तक्रार करण सोप असत असे सांगितले. 
 
रणबीरची कुठली भूमिका सर्वात जास्त आवडली या प्रश्नावर आलियाने अजूनही रणबीरचा सर्वोत्तम परफॉर्मन्स बाकी असल्याचे सांगितले. त्याची बर्फीमधली भूमिका विशेष आवडल्याचे आलियाने सांगितले. आलियाला कुठला रोल द्यायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न ऋषी दर्डा यांनी आशुतोष गोवारीकर यांना विचारला. त्यावर त्यांनी आलियाने कमी वेळात अशी उंची गाठली आहे कि, ती कुठल्याही भूमिकेत फिट होईल असे उत्तर दिले. कुठल्या अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर आलियाने परवीन बाबीच्या जीवनावरील चित्रपटात काम करावे असे रणबीरने सांगितले. 
 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.