Uddhav Thackeray says today, but the other person speaks tomorrow - Athawale | उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात - आठवले 
उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात - आठवले 

पिंपरी चिंचवड : 2019मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी आज एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील पण 250 जागांच्या जोरावर भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करतील.  भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला यावेळी आठवलेंनी दिला.

मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्याकडे गृहखातं नाही.  मात्र यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे.

एबीपी माझा च्या वृत्तानुसार, यावेळी शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की,  उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील. 
 


Web Title: Uddhav Thackeray says today, but the other person speaks tomorrow - Athawale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.